जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

सटवी/सटवाई म्हणजे काय? सटवाई नेमकी कोण आहे? #What is Satvi/Satwai? Satvai Kon aahe?

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

सटवी/सटवाई म्हणजे काय? सटवाई नेमकी कोण आहे?

सटवी/सटवाई म्हणजे काय? सटवाई नेमकी कोण आहे? #What is Satvi/Satwai? Satvai Kon aahe?
सटवी/सटवाई म्हणजे काय? सटवाई नेमकी कोण आहे? #What is Satvi/Satwai? Satvai Kon aahe?

हिंदू पुराणानुसार सटवाई देवी ही नवजात बालकांचे भविष्यलेखन करणारी देवता आहे. या सटवाई देवीस सटवी, सटुआई, सटवीका इत्यादी नावांनी ओळखले जाते. मांजर हे तिचं वाहन आहे‌. जन्मानंतर पाचव्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते. सटवाई पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. देवी सटवाई हिच नशीब देवता , भाग्य देवता , मृत्यू देवता व आयुष्य देवता व भविष्य देवता या नावांनी ओळखली जाते. "सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. हिंदू पुराण कथांमध्ये भगवान ब्रह्मदेवाची बहिण हिच देवी सटवाई आहे असे म्हटले जाते. 

सटवाईची पौराणिक कथा

सटवाईच्या मुलीला असा प्रश्न पडला की, रोज रात्री आपली आई कुठे जाते? तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला आणि तिनेे मुलीला सांगितले की, मी नवीन जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते. हे ऐकून ती मुलगी म्हणाली, तू दुसर्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे ते मला सांग. सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल. हे ऐकल्यानंतर ती मुलगी लग्नच न करण्याचा निर्णय घेते. परंतु काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो आणि योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते.

ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे पालन पोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते. परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते. ते कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले. थोडक्यात  सांगायचे असे की सटवाईने सांगितलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आश्रय आहे.

सटवाईची पूजा

सटवाईची पूजा बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी करतात बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाचे विधीलिखित लिहिते. एक कोरा कागद व टाक/पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. झोपेत हसणाऱ्या बाळास 'सटवाई हसविते' असाही एक समज आहे. सटवाई ही बाळाचं भविष्य लिहिते. बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असंही म्हटलं जातं. लोकाचारात सुतिका घर म्हणून न्हाणीत शेणाचा गोळा थापून त्यावर सटवाई चिकटवून तिची पूजा केली जाते. त्यावेळी तिथे बाळाच्या नशिबात जे जे लिहावं असं वाटतं त्या वस्तू उदा पाटी, पेन्सिल, पेन, पैसे अशा वस्तू पुजल्या जातात ( यावरूनच एखादं माणूस, प्रसंग, वस्तू, सारखी सारखी आयुष्यात येत असेल तर पाचवीला पुजलेला असा वाक्प्रचार रूढ झाला आहे) काही घरात पाच कुमारिका पूजन करून त्यांना बाळाला ओलांडून जायला सांगतात. पाचवीच्या पुड्यात असलेल्या ओवा, जायफळ, मुरडशेंग, वावडिंग, खारीक, बाळंतशेप यांची पूजा करतात खरंतर ही बाळाला लागणारी रोजची औषधी गुटी आहे. बाळंतिणीला पथ पालटणी (पथ्यात आहारात बदल)म्हणून पाच भाज्या एकत्र करून खायला घालतात. असा हा पाचवीचा सोहळा! यानंतर बाळ सव्वा महिन्याच झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात .प्राचीन काळापासून या देवीला पुजले जात असले तरी पुरूषांचा तिच्या पूजेशी काही संबंध नसतो. षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे ती अविवाहित आहे. ‘म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही दादला’ असे म्हटले जाते. याच कारणांमुळे ‘पाचवी-सटी’ या कार्यक्रमाच्या वेळेस पुरुषांची उपस्थिती टाळली जाते.

सटवाई देवी कार्य व अधिकार :

  • मनुष्याचे नशीब लिहिणे व नशीब पुसणे.
  • मनुष्याच्या जन्म व मृत्यूची नोंद करणे.
  • मनुष्याचे आयुष्य कमी जास्त करणे.
  • आपल्या भक्तांचे रक्षण व संरक्षण करणे.
  • मनुष्याच्या जीवनात संकटे देणे.
  • समाजातील वाईट लोकांना दैविक मृत्यू दंडाची शिक्षा देऊन ह्दयविकार घडवून देणे. तसेच दैविक अपघात घडवणे.
  • पृथ्वीवरील लोकांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा नोंद करून संवर्गातील देवी देवतांना कळवणे.
सदर लेख हा उपलब्ध माहितीच्या आधारावर लिहिलेला आहे. यातील सत्यता पडताळून घेणे. योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घेणे.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा आम्ही अशाच पोस्ट नेहमी पब्लिश करत असतो. त्या पोस्ट सुद्धा तुम्ही वाचू शकता. तुमच्या काही समस्या किंवा काही नवीन सुचवायचे असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कंमेंट करून सांगा.

सटवी/सटवाई म्हणजे काय? सटवाई नेमकी कोण आहे? #What is Satvi/Satwai? Satvai Kon aahe?


Follow my Instagramchannel

नवीनतम अपडेटसाठी सबस्क्राइब करा: https://omaadesh.blogspot.com

आमच्या ब्लॉगवरील सर्व लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:

 https://omaadesh.blogspot.com/2025/01/blog-post.html

इतर लेख -

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.