जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

पितृदोष म्हणजे काय? । पितृदोषाचे परिणाम व त्यावरील उपाय | Pitrudosh : Parinam Ani Upay#

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

पितृदोष म्हणजे काय? । पितृदोषाचे परिणाम व त्यावरील उपाय | Pitrudosh : Parinam Ani Upay#

    आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये मानवी आयुष्यात अनेक दोष सांगितलेले आहेत. त्यापैकी पितृदोष हा सर्वात मोठा दोष मानला जातो. जर एखाद्याच्या माग हा दोष लागला तर त्याला अनेक प्रकारचे कष्ट, अनेक प्रकारची संकट झेलावी लागतात. या दोषातून मुक्त होण्यासाठी उपाय करावे लागतात. ते उपाय काय हे आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी पितृदोष म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूया

पितृदोष म्हणजे काय?

  पितृदोष हा हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्राशी संबंधित एक संकल्पना आहे. पितृदोष, ज्याला पितृऋण देखील म्हणतात. अशी मान्यता आहे की आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला (पितरांना) काही कारणास्तव शांती मिळाली नसेल, किंवा त्यांचे एखादे कार्य पूर्ण झालेले नसेल, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पितृदोष लागतो. असे म्हणतात की मृत्यू झाल्यानंतर आपल्या पूर्वजांची आत्मा आपल्या कुटुंबाकडे लक्ष ठेवून असते आणि यदाकदाचित आपल्याकडून त्यांच्याबद्दल अनादर झाला किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले तर ते पूर्वज जे मृत झालेले आहेत ते आपल्या वंशजांना शाप वचन देतात त्यामुळे पितृदोष लागतो. पितरांच्या आशीर्वादाने त्यांच्या वंशजांची भरभराट होते परंतु इतरांचा जर कोप झाला तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्या पितृदोषाचा त्रास सहन करावा लागतो.

पितृदोषाचे परिणाम :

    ज्योतिषानुसार, पितृदोषामुळे व्यक्तीला आयुष्यात काही अडचणी, आर्थिक संकटे, आरोग्य समस्या, अपत्यसुखात अडथळे किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जसे की, कुटुंबात वारंवार वादविवाद होणे, नात्यात ताणतणाव निर्माण होणे, कुटुंबीयांमध्ये परस्पर प्रेम आणि समजूतदारपणाचा अभाव निर्माण होणे, उत्पन्नात सतत कमतरता निर्माण होणे, कामधंदा, व्यवसाय किंवा नोकरीत अडथळे येणे, संपत्ती जमा करण्यात अडथळा येणे, घरात वारंवार आजारपण येणे, गंभीर आजार किंवा उपचारानंतरही बरे न वाटणे, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य नेहमी अस्वस्थ राहणे, अपत्य प्राप्ती मध्ये अडचणी येणे, संततीच्या आरोग्य संबंधित समस्या येणे, संततीच्या शिक्षण किंवा करिअरमध्ये अडथळे येणे, विवाह होण्यास विलंब होणे, विवाहानंतर सातत्याने वाद होणे किंवा नात्यात दुरावा निर्माण होणे, पती-पत्नीमध्ये परस्पर समजूतदारपणाचा अभाव असणे, इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यात अडचणी येणे, प्रयत्नानंतरही अपेक्षित यश न मिळणे, व्यवसाय किंवा शिक्षणात अपयश येणे, सतत चिंता, भय किंवा नैराश्याची भावना येणे, घरात किंवा मनात नकारात्मक ऊर्जा जाणवणे, अपघात किंवा अचानक नुकसान होणे, घरात अपमानकारक किंवा दुखद घटना घडणे इत्यादी परिणाम दिसून येतात.

हे वाचा : सुतक म्हणजे काय? | सुतकाचे नियम | SUTAK #

पितृदोष दूर करण्यासाठी उपाय :

    पितृदोष निवारणासाठी धार्मिक, आध्यात्मिक, आणि ज्योतिषशास्त्रीय उपाय केले जातात. हे उपाय पूर्वजांना शांती मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी करण्यात येतात. येथे काही प्रभावी उपाय दिले आहेत:

  • पितृदोष निवारणासाठी श्राद्ध आणि तर्पण विधी सांगितलेला आहे. पितरांसाठी पारंपारिक पद्धतीने श्राद्ध कर्म केले पाहिजे. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात पूर्वजांच्या स्मृतीत श्राद्ध करणे महत्त्वाचे मानले जाते. पितरांना नदीमध्ये जाऊन त र्पणकरावे तसेच तांदूळ, दूध, तीळ अर्पण करावे.
  • त्र्यंबकेश्वर, काशी, गया किंवा इतर तीर्थक्षेत्रांवर जाऊन पिंडदान करावे. पिंडदानामुळे पितरांच्या आत्म्यास शांती मिळते आणि त्यामुळे पितृदोष निवारण होते.
  • पितृस्तोत्र किंवा पितृसूक्त यांचे नियमित पठण करावे आणि दररोज "ॐ पितृभ्यो नमः" किंवा "ॐ नमः शिवाय" या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
  • गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धन इत्यादी वस्तूंचे दान करावे. ब्राह्मण भोजन आणि गोरक्षणासाठी दान करावे. पितृपक्षात पितरांच्या नावाने अन्नदान केल्याने पितृदोष नाहीसा होतो.
  • हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड यांचे वाचन करावे. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाची उपासना करावी. त्यांच्या उपासनेमुळे पितृदोषाचा प्रभाव कमी होतो.
  • योग्य ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली पितृदोष निवारणासाठी नारायण नागबली पूजा व रुद्राभिषेक करणे. या विशेष पूजा केल्याने पितरांचा दोष नाहीसा होतो.
  • आपल्या कुंडलीत सूर्य, राहू, केतू किंवा शनी ग्रहाचे दोष असल्यास त्या ग्रहांची शांती करावी  तसेच सूर्य देवाची पूजा करावी व सूर्याला अर्घ्य द्यावे.
  • पितृदोष निवारणासाठी आपल्या घरात भगवद्गीतेतील सातव्या अध्यायाचे वाचन करावे तसेच रामायण, गीता, महाभारत किंवा अन्य धर्मग्रंथाचे वाचन करावे.

    पितृदोष हा अध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकल्पनेवर आधारित आहे. यात श्रद्धा, कर्म आणि परंपरांचा मोठा भाग असतो. पितृदोषाचे परिणाम व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहयोगांवर आणि परिस्थितीनुसार वेगवेगळे असू शकतात. योग्य ज्योतिष सल्ल्यानुसार पितृदोष ओळखून त्यावर उपाय करणे महत्त्वाचे आहे.

पितृदोष म्हणजे काय? । पितृदोषाचे परिणाम व त्यावरील उपाय | 
Pitrudosh : Parinam Ani Upay#

इतर लेख -


आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आपले अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.


No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.