जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

पती पत्नीतील वाद व त्यावरील उपाय / Pati Patni madhil Vaad Ani Upay #

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

पती पत्नीतील वाद व त्यावरील उपाय  / 

Pati Patni madhil Vaad Ani Upay #


        संसार म्हटला की त्यात भांडणं होणारच. मग ते भांडण भावाभावात असेल, दोन बहिणीत असेल, मित्रांमध्ये असेल किंवा पती पत्नीत असेल. आज आपण पती पत्नीतील वाद या विषयावर बोलूया. पती-पत्नीमध्ये वाद होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे कारण जेथे प्रेम असते तेथे वादही अवश्य असतात. परंतु कधीकधी हे वाद प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात. याचा प्रभाव कुटुंबातील इतर सदस्यांवर पडतो. कित्येकांचे तर संसारच उध्वस्त होतात. असे कित्येक संसार मोडण्यापासून वाचवता येऊ शकतात. त्यासाठी काही उपाय केले पाहिजेत.

चला तर मग जाणून घेऊ या, कोणकोणते आहेत हे उपाय...


1) पती-पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी उशीखाली कापूर ठेवावा. सकाळी उठल्यावर हा कापूर जाळावा. असे केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते.

2) समजा पतीचा स्वभाव जर खूप रागीट असेल तर पत्नीने रोज एखाद्या शिव-पार्वती मंदिरात जाऊन लाल फुल अर्पण करावे.

3) कण्हेरीचे फुल पाण्यात उगाळून घ्यावे याचा कपाळावर टिळा लावल्यास पती-पत्नीमधील प्रेम वृद्धिंगत होते.

4) पती-पत्नीने एकत्रितपणे शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यामुळे दाम्पत्य जीवनात सुख प्राप्त होते.

5.  प्रत्येक गुरुवारी पती-पत्नी दोघांनीही भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र, पिवळे फळ आणि मिठाई अर्पण करावी.

6. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती-पत्नीने रोज केळीच्या झाडाला जल अर्पण करावे किंवा केळीचे मूळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून उजव्या हातावर बांधावे. वैवाहिक जीवन सुखी करण्याचा हा प्रभावी उपाय आहे.

7. काहीवेळा घरातील नकारात्मक प्रभावामुळे पती-पत्नीमध्ये वाद होतात. या नकारात्मक प्रभावापासून दूर राहण्यासाठी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे.

8) रात्री झोपताना आपले डोके पूर्वेकडे ठेवा. यामुळे तुम्हाला तणावापासून आराम मिळेल. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

9) प्रत्येक शुक्रवारी तांदुळाची खीर करून याचा नैवेद्य देवाला दाखवावा. त्यानंतर पती-पत्नीने दोघांनी एकत्र बसून खीर खावी. यामुळे वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते.

10) वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीची खोली नेहमी स्वच्छ असावी. बेडखाली कचरा, शूज, चप्पल किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका. यामुळे नकारात्मकता निर्माण होते आणि त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो

11) शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन गुलाबाचे फुल व शृंगाराचे सामान अर्पन करावे तसेच सफेद रंगाची मिठाई अर्पण करावी. त्यामुळे पती पत्नीत गोडवा निर्माण होतो.

12) भांडणाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. यानंतर चौकाच्या मध्यभागी मिठाई दिव्यासह ठेवा. काही दिवसातच तुम्हाला या उपायाचा प्रभाव दिसून येईल.

13) घरामध्ये शंकर-पार्वती यांचा प्रसन्न मुद्रा असलेला फोटो लावावा व त्या फोटोला रोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यामुळे घरात नेहमी शांतता राहते.

14) गुरुवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा व एक दिवा चौकात म्हणजे चार फाट्यावर लावाव तसेच एक मिठाई त्यासोबत ठेवावी.

15) झेंडूचा फुलाचा वापर करूनही पती आणि पत्नी मधील प्रेम वाढू शकते. त्यासाठी झेंडूची काही फुले घेऊन त्यावर कुंकू लावावे आणि ही फुले देवाला अर्पण करावीत.


            आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.