जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

पंचतत्व | पंचमहाभूते | Pancha Tatva | Five Elements #

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

पंचतत्व | पंचमहाभूते Pancha Tatva | Five Elements #





          पंचतत्व म्हणजे नेमकं काय? आणि ती नेमकी कोणती असतात? याविषयी आपण आज सविस्तर पाहणार आहोत. आपण पूर्वीपासून या पंचतत्वांविषयी ऐकत आलोय. नेमकी ही पंचतत्व कोणती कार्य करतात? यापासून कशाची निर्मिती होते? आणि पुन्हा या पंचतत्वातच विलीन कसे होतो? हे आपण सविस्तर पाहूया. तसे पाहता विश्वाच्या आणि मनुष्याच्या उत्पत्तीला कारण असणारी मूळ तत्वे म्हणजे जी पंचतत्वे होय. यांनाच "पंचमहाभूते" असेही म्हणतात. हे पंचमहाभूते सृष्टीच्या उत्पत्तीला कारण आहेतच परंतु या तत्त्वांच्या अंगी असलेली शक्ती अचाट आणि अफाट आहे.

        ही पंचमहाभूते पुढील प्रमाणे होय पृथ्वी आप म्हणजेच पाणी तेज वायू आणि आकाश. हे पाच घटक जीवनात खूप महत्त्वाचे आहेत. या पंचतत्वांविषयी पुरानातही माहिती सांगितली गेलेली आहे. पुराणानुसार गेलं तर या पंचतत्वांपैकी सर्वात पहिले आकाश त्यानंतर वायु त्या पाठोपाठ अग्नी, पाणी आणि सर्वात शेवटी पृथ्वी हे तत्व तयार झाले. हे तत्व प्रत्येक जीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतात. पंचमहाभूतांच्या या कमी अधिक प्रमाणामुळेच या सकल विश्वात अनेक प्रकारचे जीव आढळून येतात.

जरूर वाचा- पंचप्राण आणि त्यांचे कार्य | Panch Pran Vayu and Functions #

आता या पंचतत्वांबद्दल आपण क्रमशः जाणून घेणार आहोत.

1) आकाश :-

        पंचतत्वांमधील पहिले तत्व म्हणजे आकाश होय. आकाश म्हणजे आपले मन. आकाश जसे अनंत आहे अगदी तसेच आपल्या मनालाही सीमा नाही. हे सुद्धा अनंत आहे. आकाशात जसे ढग दाटून येतात, धूळ उडते, प्रकाश पडतो अगदी त्याचप्रमाणे मनातही सुख, दुःख, निराशा, शांती इत्यादी भावना निर्माण होतात.

2) वायु :-

        वायु हे पंचतत्वातील दुसरे तत्व आहे. या तत्त्वाला म्हणजेच हवेला पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा घटक मानला गेला आहे. जीवसृष्टीसाठी हा घटक महत्त्वाचा आहे. आपलं शरीर हे या तत्त्वाच सेवन करते म्हणजेच प्राणवायू घेते. त्यामुळेच आपल्या शरीराला "सजीव: असे म्हणतात. हा जिवंतपणा आहे तो सर्व या तत्त्वातील घटकांमुळे आहे. या सृष्टीतील सर्वच सजीवांना मग ते झाड असो, प्राणी असो, पक्षी असो किंवा इतर कुठल्याही योनीतील जीव असो सर्वांना वायूची म्हणजे हवेची गरज आहे.

3) अग्नी :-

        अग्नि हे पंचतत्वातील तिसरे तत्व आहे. ऊर्जेच्या स्वरूपात अग्नी आपल्या शरीरात असतो. उष्णता, शक्ती, ऊर्जा इत्यादी माध्यमातून हे तत्व आपल्या शरीरात वावरत असते. आपल्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण याच घटकामुळे अबाधित असते. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

4) पाणी :-

        या पंचतत्वातील चौथे तत्त्व म्हणजे पाणी होय. हे पाणी मनुष्य देहात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. पाणी हे मानवी जीवनाचा आणि सृष्टीतल्या चराचराचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जसे सृष्टीमध्ये ७१ टक्के पाणी व 29 टक्के जमीन आहे, त्याचप्रमाणे मानवी शरीरात देखील टक्के पाणी असते. म्हणूनच असे म्हणतात की मनुष्य अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. परंतु पाण्याशिवाय जगणं कठीण आहे.

5) पृथ्वी :-

        या पंचतत्वातील पाचवे तत्त्व म्हणजे पृथ्वी होय. आपल्या शरीरातील किंवा सृष्टीतील इतर तत्त्वांना विकसित होण्यासाठी पृथ्वी या तत्त्वाचा आधार घ्यावा लागतो. श्रवण, गंध, चव, स्पर्श आणि दृष्टी या पंच इंद्रियांद्वारे हे तत्व समजते, स्नायू आणि हाडे असलेले भौतिक शरीर म्हणजे पृथ्वी होय.

        या पंचतत्त्वांच्या सहयोगाशिवाय मानवी जीवनात सर्व अशक्य आहे. या पंचतत्त्वांच्या संयमनानेच मनुष्य आपली प्रगती साधू शकतो मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी या पाच तत्वाचे शरीर घेऊन तो येतो आणि ज्यावेळेस तो मृत होतो म्हणजेच देहत्याग करतो त्यावेळेस तो याच पंचतत्त्वांमध्ये विलीन होत असतो.


        आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

अधिक लेख-

आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.