जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

पंचप्राण आणि त्यांचे कार्य | Panch Pran Vayu and Functions #

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

पंचप्राण आणि त्यांचे कार्य | Panch Pran and Functions #

        आपण सर्वांनी पंचप्राण हा शब्द ऐकलेला असेलच. परंतु या पंचप्राणाविषयी बऱ्याच जणांना प्रश्न पडले असतील की, नेमकं पंचप्राण म्हणजे काय? त्यांचे कार्य कोणती? तर चला आपण याच पंचप्राणा विषयी माहिती मिळवू या. हिंदू पुराणानुसार घेतले तर प्राण ही एक ऊर्जा असून ती आपल्या जन्मापासून सुरू होते आणि आपल्या मृत्यूपर्यंत ती टिकते. ही ऊर्जा आपल्या सर्वांच्या आत लपलेली आहे. 

        प्राण ही एक जीवनदायीनी शक्ती आहे, जी आपल्याला जिवंत ठेवते, मनुष्यद्वारे होणाऱ्या प्रत्येक कृतीमध्ये प्राण हा सामावलेला आहे. मानवी शरीर हे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्त्वांनी बनलेले आहे. यापैकी वायू म्हणजे आपण श्वासास्वाचातून जी हवा घेतो त्याला प्राण असे म्हणतात. तो प्राणच आपल्याला जिवंत ठेवत असतो.

        याच प्राणाचे पाच प्रकारात विभाजन होऊन मानवाच्या प्रत्येक कृतीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि ह्याच पाच प्रकारात विभागल्या गेलेल्या प्राण्यांना "पंचप्राण" असे म्हणतात ती पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान. या प्रत्येक प्राणाची कार्य वेगवेगळी असून त्यांचे स्थानही वेगवेगळे आहे. ते आपण आता पुढे पाहणार आहोत.

1) प्राण | प्राणवायू (Respiratory System)

        आपल्या कंठापासून ते हृदयापर्यंत जो प्राण किंवा जो वायू कार्य करतो त्याला "प्राण" असे म्हणतात. श्वसनासंबंधी कार्यामध्ये हा वायू वापरला जातो. अन्ननलिका, श्वसन नलिका, फुफ्फुस, हृदय यांना सक्रिय ठेवण्यासाठी या वायूचा उपयोग होतो.

2) अपान | अपान वायू(Excretory System)

        आपण वायू हा नाभीपासून तर मुलाधार चक्र पर्यंत म्हणजेच खालच्या दिशेने वाहतो. या वायूमुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ. मलमूत्र इत्यादी बाहेर टाकले जातात. हा वायू जर संतुलित नसेल तर शरीराला सुस्ती येणे, खाज सुटणे, मधुमेह इत्यादी सारखे रोग होतात.

3) उदान |उदान वायू

        कंठा पासून ते डोक्यापर्यंत जो वायू कार्यरत असतो त्याला उदान वायू असे म्हणतात. घशापासून वरील सर्व अंग म्हणजेच डोळे, नाक, चेहरा यांना हा वायू ऊर्जा देत असतो तसेच आपल्या मस्तकालाही सक्रिय ठेवत असतो. या वायूच्या असंतुलनामुळे दृष्टी किंवा ऐकण्यासंबंधी समस्या निर्माण होतात.

4) समान|समान वायु(Digestive System)

        हृदयापासून नाभीपर्यंत शरीरात सक्रिय असणाऱ्या प्राण वायूला समान वायु असे म्हणतात. हा वायू शरीरातील अग्नी तत्वांवर कार्य करतो. पचनक्रियेत  लागणारी उष्णता संतुलित ठेवण्यास मदत करतो या वायूच्या असंतुलनामुळे भुके संबंधित समस्या निर्माण होतात

5) व्यान |व्यान वायु(Circulatory System)

        हा वायू मानवी शरीरातील पाचवा प्राण असून तो संपूर्ण शरीरात व्याप्त असतो. नाडी मार्गे वेगवेगळ्या अवयवातून जातो. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांमध्ये पोषकतत्वे हस्तांतरित करणे हे या वायूचे काम आहे. या प्राणाचे संतुलन जर राखले गेले नाही तर स्नायूसंबंधी विकार मनुष्याला जतात

        या पंचप्राण व्यतिरिक्त मनुष्य देहात पाच उपप्राण देखील आहेत ती म्हणजे देवदत्त, नाग, क्रुकल, कूर्म आणि धनंजय हे पंच उपप्राण शिंका येणे, डोळे लाउघड होणे, जांभ देणे, त्वचेला खाज सुटणे, उचकी येणे इत्यादी कार्य करतात.


अधिक लेख-

आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.