जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

काही आयुर्वेदिक उपाय Health Tips# | आरोग्य संबंधी माहिती

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

काही आयुर्वेदिक उपाय Health Tips# | आरोग्य संबंधी माहिती


आयुर्वेदिक उपाय | घरगुती उपाय | HEALTH TIPS#

  1. जेवणाच्या वेळी कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते.
  2. जर तुमच्या शरीरात लोहारची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत याने लोहाचे प्रमाण वाढते.
  3. कारल्याची भाजी आठवड्यातून दोनदा खावी. यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते.
  4. केसांना तीळाचे तेल लावल्यास तुमचे केस कधीही गळणार नाहीत. आणि असे केल्याने काही दिवसातच केस वाढू लागतील.
  5. आले पाण्यात उकळून सकाळ-संध्याकाळ प्यायल्याने संधिवात पासून आराम मिळतो.
  6. केशर मिसळून गरम दूध प्यायल्याने छातीतिल कफ निघून जाईल.
  7. रिकाम्या पोटी तुळशीची पाने स्वच्छ धुऊन कोमट पाण्यात टाकून खावे पित्त कमी होते.
  8. उचकी थांबत नसेल तर उसाचा रस प्यायल्याने उचकी थांबते.
  9. जर मुलाला रात्री झोप येत नसेल तर त्याला मध खाऊ घाला.
  10. लसूण भाजून खाल्ल्यास सर्दी, खोकला या आजारांवर अत्यंत गुणकारी ठरते. खोकला झाल्यावर मुद्दाम लसूण भाजून खावी.
  11. रोज रात्री एक ग्लास गरम पाण्यात तुम्ही एक चमचा तूप मिक्स करा आणि ते पाणी प्या. यामुळे तुम्हाला सकाळी बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. 
  12. मासिक पाळीाचा जास्त त्रास होत असेल तर थंड पाण्यात लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावं.
  13. लोण्यात थोडे केसर मिसळून ओठांना दररोज लावल्यास ओठांचा काळेपणा कमी होईल.
  14. तोंडाला दूर्गंध येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास वास येत नाही.
  15. घसा खवखवत असल्यास सकाळी रिकाम्यापोटी बडीशेप चावून खावी.
  16. चहाच्या उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसगळती थांबते.
  17. कांद्याची पेस्ट करून काही दिवस केसांना लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात.
  18. त्वचाविकार झाला असल्यास कच्च्या बटाट्याचा रस लावावा.
  19. सफरचंद सोलून त्याचे बारिक तुकडे करावेत. या तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास डोकेदुखी कमी होते.
  20. आवळा आणि हळद समान मात्रामध्ये बारीक करून चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घ्यावे. या उपायाने वजन जलद गतीने कमी होऊ लागेल.

काही आयुर्वेदिक उपाय Health Tips# | आरोग्य संबंधी माहिती

अधिक लेख-

आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

Follow my YouTube channel

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.