जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!
भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#
        
भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#

        भक्त कसा असावा? असा प्रश्न ऐकला तरी मनात अनेक विचारांची घोडदौड सुरू होते. तसे पाहिले तर भक्ताचे दोन प्रकार पडतात. निर्गुण निराकार भगवंताची भक्ती करणारे भक्त  आणि सगुन साकार भगवंताची भक्ती करणारे भक्त. आता आपणास प्रश्न पडेल की या दोघांमध्ये नेमकं श्रेष्ठ कोण? हाच प्रश्न अर्जुनाला देखील पडला होता. त्यावेळी भगवंत अर्जुनाला म्हणाले, जे भक्त माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर भावाने माझ्या भजनात, पूजनात रत झालेले असतात आणि जे भक्त अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन माझे सगुण रूप भजतात ते भक्त मला अतिउत्तम वाटतात. कारण निर्गुण निराकार परब्रम्हात चित्त गुंतलेल्या भक्ताच्या साधनात कष्ट जास्त असतात.

            जे भक्त सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून माझ्या सगुण रूपाची भक्ती भावाने निरंतर पूजा करतात उपासना करतात त्या माझ्या प्रेमी भक्तांचा मी या भव सागरातून तात्काळ उद्धार करतो. ज्या भक्ताला कशाचेही अपेक्षा नाही जो अंतर्बाह्य शुद्ध आहे, तटस्थ, चतुर, दुःखमुक्त आहे आणि ज्या भक्ताला आपल्या कर्तुत्वाचा तीळमात्र ही अभिमान नाही असा भक्त मला प्रिय आहे.

           ज्या भक्तापासून कोणत्याही प्राणी मात्राला त्रास होत नाही. तसेच कोणत्याही प्राणी मात्राचा त्याला कंटाळा येत नाही. हर्ष, मत्सर, भीती आणि उदवेग इत्यादीपासून जो भक्त अलिप्त असतो तो फक्त मला सदैवप्रिय आहे.

            जो भक्त आपल्या शुभ अशुभकर्मांचा त्याग करतो किंवा कुठल्याही परिस्थितीत हर्षयुक्त होत नाही किंवा कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कशाची इच्छा व्यक्त करीत नाही तो भक्तीयुक्त पुरुष नेहमी माझ्याजवळ असतो आणि मला तो सदैवप्रिय आहे.

            जो भक्त शत्रू आणि मित्र मान अपमान याविषयी सारखा भाव बाळगतो तसेच ऊन, वारा, सुख, दुःख इत्यादी मध्ये ज्याची वृत्ती सारखीच असते, ज्याला आसक्ती नसते, ज्याला निंदास्तुती सारखीच वाटते, जे मिळेल त्यानेच उदरनिर्वाह करण्यात नेहमी समाधानी असतो तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो.

        

भगवंत अर्जुनाला सांगतात माझ्यातच मन ठेव माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर म्हणजे तू माझ्यातच राहशील यात तीळमात्र शंका नाही.

            निर्गुण निराकाराची भक्ती करणाऱ्या भक्ता विषयी भगवंत म्हणतात, जे पुरुष इंद्रिय समूहाला म्हणजेच आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवतात आणि मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप असणाऱ्या अविनाशी सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावाने भक्ती करतात, उपासना करतात, जे भक्त सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर असतात आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे असतात ते भक्त पण मलाच येऊन मिळतात

           भगवंत शेवटी म्हणतात की जे श्रद्धाळू भक्त माझे ठाई लीन होऊन वर सांगितल्याप्रमाणे धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत ते सदैव माझ्या समवेत माझ्या निकट वास करतात.


 हेही वाचा-

            आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.


Follow my YouTube channel

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.