मंत्रात शक्ती असते का ? Power Of Mantra #
मंत्रात शक्ती असते का ? Power Of Mantra #
सध्याच्या काळामध्ये मानवाला अनेक संकट अनेक अडचणी भेडसावत आहेत. या अडचणी ही संकट कशामुळे आली ? या प्रश्नांची उत्तरे मिळतातच असे नाही परंतु अडचणी मुळे होणारा त्रास हा तर होतच असतो. यामुळेच मनुष्य त्रस्त होऊन इतर मार्गाच्या शोधात लागतो. आधुनिक तंत्र आधुनिक विज्ञान व इतर पर्याय शोधून झाल्यानंतर जेव्हा मनुष्याला आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळत नाहीत त्यावेळेस या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मनुष्य अध्यात्माकडे ओढला जातो. धर्मशास्त्रात दिलेली स्तोत्र, मंत्र, पाठ आदींचे तो अनुकरण करू लागतो. आणि या मंत्रांचा मनुष्याला फायदा देखील होतो.
आता एक प्रश्न पडतो की मंत्र म्हणजे काय? आणि या मंत्रात शक्ती असते का? मंत्र म्हटले म्हणजे त्यात विशिष्ट अशा शब्दांचा समूह असतो ज्याद्वारे आपण मनात इच्छिलेले साध्य करू शकतो आणि नकारात्मक अडथळे दूर करू शकतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार मंत्र या शब्दाची व्याख्या "मन: तारयति इति मंत्र:" अशी केली गेली आहे. याचाच अर्थ मनाला तारणारा ध्वनी किंवा नाद म्हणजे मंत्र होय.
मंत्र या शब्दांमध्ये "म" म्हणजे मन किंवा मनन आणि "त्र" म्हणजे शक्ती किंवा रक्षा. याचा अर्थ मनन आणि संरक्षण यांनी जो शब्दसमूह संपन्न झाला आहे त्या शब्दसमूहाला मंत्र असे म्हणतात. या शब्दसमूहाचे योग्य संयोजन करून जोध्वनी उत्पन्न झाला त्या ध्वनीमुळे संपूर्ण सृष्टीचे कल्याण झाले. सनातन हिंदू धर्मानुसार मंत्र या शब्दाचा अर्थ अमर्यादित आहे. वेदांमध्ये दिलेल्या स्तोत्रांच्या प्रत्येक श्लोकला देखील मंत्र म्हटले जाते. देवी देवतांच्या स्तुतीसाठी आणि यज्ञ होमासाठी निश्चित केलेल्या शब्द समूहाला देखील मंत्र म्हटले जाते.
हे ही वाचा - पंचप्राण आणि त्यांचे कार्य | Panch Pran Vayu and Functions #
या मंत्रांचा मानवावर काही परिणाम होतो का? या मंत्रांमध्ये काही शक्ती आहे का? हे समजून घेण्यासाठी आपण एक साधे उदाहरण घेऊया. जर एखादा व्यक्ती आपल्याला वाईट साईट बोलत असेल तेव्हा त्याने बोललेल्या त्या शब्दांचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. परिणामी आपल्याला राग येतो. त्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्या व्यक्तीविषयी घृणा वाटू लागते. त्या व्यक्तीचा आपण तिरस्कार करू लागतो. हे सर्व का झालं? याचा आपण विचार केला तर हे लक्षात येईल की त्या व्यक्तीने आपल्याबद्दल काढलेल्या वाईट शब्दांमुळे हे सारं घडलं. याचाच अर्थ त्या व्यक्तीच्या साध्या शब्दांमध्ये आपल्याला नकारात्मक बनवण्याचे सामर्थ्य होतं. आणि समजा या उलट जर एखाद्याने आपली स्तुती केली तर आपलं मन सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. ते अगदी प्रसन्न होतं. याचा अर्थ त्या स्तुती साठी वापरलेल्या शब्दांमध्ये सामर्थ्य होतं असं म्हणावं लागेल.
अगदी तसंच या मंत्रातील शब्दात देखील एक ऊर्जा असते. मंत्र ही एक अद्वितीय शक्ती आहे. अनेक ऋषीमुनींच्या, साधुसंतांच्या अभ्यासातून, त्यांच्या संशोधनातून हे मंत्र तयार झालेले आहेत. या मंत्र उच्चाराचे आपले एक वेगळेच महत्त्व आहे. योग्य पद्धतीने जर मंत्र उच्चार झाला तर मनुष्यभोवती सर्व संसारिक, अध्यात्मिक सुख नांदत असतात. या मंत्रांच्या साहाय्याने मनुष्य मोक्ष प्राप्ती सुद्धा मिळवू शकतो. मंत्रात इतकी शक्ती आहे की ज्या देवी किंवा देवता विषयी आपण मंत्रोच्चारण करतो ते देखील प्रकट होऊ शकतात.
आता उदाहरण म्हणून घ्यायचं ठरलं तर नुसता "ॐ" हा शब्द जरी आपण शांतपणे उच्चारला तर आपल्या ब्रह्मरंधरात प्रभावी स्पंदन, लहरी निर्माण होतात किंवा विशिष्ट कंपन जाणवते. म्हणजे आपल्या शरिरातील विशिष्ट ठिकाणी कंपन होऊन लहरी उत्पन्न होतात. आणि निश्चितच त्यातून एक सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. ही जादू वगैरे नाही तर आपलीच ऊर्जा असते. फक्त ती गतिमान होत
यावरून हेच सिद्ध होते की मंत्रात सामर्थ्य असते, शक्ती असते. फक्त त्या मंत्राचे उच्चारण शुद्ध पद्धतीने आणि योग्य व्यक्तीकडून झाले पाहिजे.
- मनोवांच्छित संतती / MANOWANCHHIT SANTATI #
- भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#
- कर्मयोग
- काही आयुर्वेदिक उपाय Health Tips | आरोग्य संबंधी माहिती
- सहज बोलणे हित उपदेश। करुनि सायास शिकविती ।।
- एकविरा माता माहिती
छान माहिती खूप खूप साध्या शब्दांमध्ये..
ReplyDelete