जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

वडील | बाप | जनक | पिता | बाबा |- Father #

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

वडील | बाप | जनक | पिता | बाबा | - Father #



या पृथ्वीतलावर मनुष्य प्राण्याला जन्माला घालण्यासाठी कारणीभूत ठरणारा पुरुष म्हणजेच वडील.

        वडील, बाप, जनक, पिता,  बाबा अशा अनेक विविध  नावाने ओळखले जाणारे असे हे व्यक्तिमत्व. खूप दिवसांपासून मनात होतं कि, वडिलांविषयी काहीतरी मत मांडावे. पण  वडील या  व्यक्तिमत्त्वाविषयी  काय लिहावं  आणि किती लिहावे यातच अडकून राहिलो कारण दोन-चार शब्दात वर्णन करण्याएवढ वडिलांचं व्यक्तिमत्व हे मुळीच नाही.  मी तर म्हणतो की घराघरात ईश्वराच्या रुपाने अवतरलेले स्वरूप म्हणजेच वडील होय. याप्रमाणे चराचरात परमेश्‍वर असून देखील आपल्याला या डोळ्यांनी दिसत नाही त्याच पद्धतीने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांची अनमोल साथ असूनही त्यांची ती धडपड आपल्या नजरेत कधीच भरत नाही. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत वडिलांचा खूप मोठा प्रभाव पडतो. 

        संसाराचे रहाटगाडगे ओढत असताना ची आपल्या वडिलांची धडपड हळू हळू आपल्या नजरेआड होत जाते आणि त्यामुळे वडिलांची भूमिका नेहमी पडद्याआड राहते. तसं पाहिलं तर जगात जेवढे महत्व आईला आहे तेवढेच किंवा त्या पेक्षा जास्त महत्त्व वडिलांना आहे आईची भूमिका आपल्याला वेळोवेळी स्पष्ट दिसत आहे म्हणून मुलांचा ओघ किंचितसा आईकडे जास्त असतो आणि वडिलांकडे बहुतांशी दुर्लक्ष होतं ज्याप्रमाणे आपल्याला एखादी जखम झाली ती जखम सर्वांना दिसते परंतु त्यामागील होणारी वेदना ही कोणालाही दिसत नाही अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील आईचे प्रेम सर्वांना दिसते वडिलांचे भावना वडिलांचे प्रेम मात्र आपल्या नजरेआड राहते परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या व्यक्तिमत्व विकासावर किंवा आयुष्याच्या जडणघडणीत वडिलांच्या प्रेमाचा ही वाटा मोठा असतो मुलांच्या कल्याणात वडील हे आधारस्तंभ म्हणून नेहमीच अग्रेसर असतात.

हेही वाचा- पती पत्नीतील वाद व त्यावरील उपाय / Pati Patni madhil Vaad Ani Upay #

        आपल्या परिवाराला आयुष्यभर सुखाची सावली मिळावी म्हणून बाप आयुष्यभर रणरणत्या उन्हात जळत असतो. दिवसभरात थकून भागून वडील घरी आले आणि घरात शांतता नसली तर त्यांची थोडी चिडचिड होते त्यामुळे मुलं वडिलांपासून थोडीशी का होईना दूर जातात. घरात मुलांना शिस्त लागावी म्हणून थोडीशी कडक भूमिका वडील घेत असतात त्यांच्या कडक भूमिकेमागे चांगले उद्दिष्टे लपलेले असते. प्रत्येकाच्या वडिलांचा स्वभाव  हा वेगवेगळा असू शकतो  कोणाचे वडील कठोर,  कोणाचे प्रेमळ,  कोणाचे शिस्त प्रिय  आणि खंबीर  असे अनेक प्रकारचे स्वभाव  वडिलांचे असू शकतात.  पण पण काहीही झाले तरी घराच्या सुखासाठी  व  परिवाराच्या काळजीपोटी  ते नेहमीच संघर्ष करतात. आई, वडील, बायको, मुलं व इतर  सगळ्यांच्या भावनांचा  ते नेहमी आदर करतात. ज्याप्रमाणे नारळ असते ना वरून कडक पण आतून नरम अगदी त्याचप्रमाणे वडील वरून कडक दिसतात पण आतून आपल्या मुलांविषयी त्यांच्या मनात खूप प्रेम असते पण ते प्रेम समजून घेण्यासाठी मुलाकडे वडिलांची नजर असावी लागते. वडीलांचे प्रेम आपण जोपर्यंत स्वतः वडील होत नाही तोपर्यंत समजू शकत नाही.

        आपलं कुटुंब, आपली मुलं सुखात राहावे म्हणून वडील नेहमीच आपल्या सुखांना तिलांजली देतात. दिवस-रात्र ते मेहनत करतात आणि मुलांना काही कमी पडू नये याची काळजी घेतात ते आपल्या मुलांना सर्व त्या सुविधा देऊ इच्छितात ज्या त्यांना कधीच मिळाल्या नाहीत. आपल्या परिवारात येणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या अडचणींना खंबीरपणे उभे राहून ते तोंड देत असतात. मग मुलींचं लग्न असो मुलांचं शिक्षण असो किंवा इतर काही गोष्टी असो. सध्याच्या या काळात याच वडिलांकडे लक्ष द्यायला आज कुणाकडे वेळ नाही. प्रत्येक जण आपल्या संसारात व्यस्त आहे. वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या त्यागाची आज आपल्याला आठवण पडली आहे आपण सहज म्हणून जातो, काय केले वडिलांनी आपल्यासाठी? पण एक नेहमी लक्षात ठेवा आयुष्यभर खस्ता खाऊन जो आपल्याला रस्ता दाखवतो तो बापच असतो. जर तो आपल्या पाठीशी उभा राहिला नसता तर आज आपण इथवर आलो नसतो बापाने जर स्वतःचा विचार केला असता तर आपली स्थिती वाईट राहिली असती

        आई ही संसार रुपी समई तील ज्योत असली तरी त्या ज्योती साठी लागणारे तेल म्हणजे वडील. प्रकाश देणारी समईतील ज्योत सर्वांना दिसते पण त्या ज्योतीला प्रकाश देण्यासाठी जळणारे तेल याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते संसार रुपी गाड्याला एकदा स्वतःला बांधल्यानंतर अखेरचा श्वास घेईपर्यंत वडील ते गाड ओढतच असतात आपल्या डोळ्यादेखत त्यांची हयात काबाडकष्ट करण्यातच निघून जाते आणि कधी बाप आपल्या नजरेसमोरच काळाच्या पडद्याआड जातो हे आपल्या लक्षातच येत नाही.

         काय उपमा द्यावी हो वडिलांना, आभाळाची द्यावी की समुद्राची द्यावी आभाळ म्हटलं तर जोपर्यंत त्यात पाणी आहे तोपर्यंत ते बरसते आणि समुद्राच्या म्हटलं की त्यालाही नेहमी भरती-ओहोटी चालूच असते पण वडिलांच्या कष्टाला कधीही अंत नसतो त्यांच्या जबाबदारीला ही कधी अंत नसतो. मी ऐकलं आहे की  आई घराच मांगल्य असते  आणि वडील घराचा आधार हे अगदी तंतोतंत खरे आहे म्हणून म्हणतो मित्रांनो जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत घ्या जगून त्यांच्यासोबत कारण एकदा की वडील रुपी आधार गेला की मग आयुष्यभर आपण त्यांच्या सुखाला पोरके होतो.


अधिक लेख-

आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.