जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

मनोवांच्छित संतती / MANOWANCHHIT SANTATI #

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

मनोवांच्छित संतती / MANOWANCHHIT SANTATI #


मनोवांच्छित संतती / MANOWANCHHIT SANTATI #


        प्राचीन कालापासून संतती प्राप्तीसाठी ऋषीमुनींनी काही नियम सांगुन ठेवलेले आहेत. पुरातन काळातील लोक याच नियम संयमनानेच संतान उत्पत्ती  करत होते. उत्तम संतान प्राप्त व्हावी अशी प्रत्येक दांपत्याची इच्छा असते कारण जर संतती गुणवान,चरित्रवान आणि सत्यवान  असेल तर समाजात मान सन्मानात वाढ होते जर आपणासही अशा प्रकारच्या गुणवान, चरित्रवान व सत्यवान अशा पुत्राची इच्छा असेल तर आपणास आम्ही मासिक धर्मातील रात्री विषयी काही माहिती सांगणार आहोत जी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

        मासिक पाळी सुरू झाल्यानंतर प्रथम चार दिवस हे सहवासासाठी वर्ज्य असतात. या चार दिवसात सहवास केल्यावर मनुष्याला विविध प्रकारचे रोग प्राप्त होत असतात. पाचव्या रात्रीपासून संतान प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. ऋतुकालप्राप्तीनंतर 4,6,8,10,12,14 किंवा 16 व्या रात्री गर्भधारणामुळे पुत्रप्राप्ती होत असते. याउलट 5,7,9,11,13 किंवा 15व्या रात्रीच्या गर्भधारणामुळे कन्या प्राप्ती होत असते

    आता आपण कोणत्या रात्री गर्भधारणा झाल्यामुळे कशी संतती उत्पन्न होते याविषयी सविस्तर माहिती पाहूया. 

    1) चौथ्या रात्रीच्या गर्भधारणामुळे झालेला पुत्र अल्पायु व दरिद्री होतो.
    2) पाचवा रात्रीच्या गर्भधारणेतून जन्माला आलेली मुलगी भविष्यात फक्त मुलींनाच जन्म देईल.
    3) सहाव्या रात्रीच्या गर्भधारणेतन जन्माला आलेला पुत्र मध्यम आयुचा असेल.
    4) सातव्या रात्रीच्या गर्भधारणेतून जन्माला आलेली मुलगी ही वांझ होईल.
    5) आठव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेला मुलगा हा ऐश्वर्य संपन्न असेल.
    6) नवव्या रात्रीच्या गर्भामुळे ऐश्वर्यशाली मुलीचा जन्म होतो.
    7) दहाव्या रात्रीच्या गर्भामुळे चतुर पुत्राची प्राप्ती होते.
    8) अकराव्या रात्रीचा गर्भधारणेमुळे चरित्रहीन मुलगी जन्माला येते.
    9) बाराव्या रात्रीच्या गर्भधारणेमुळे पुरुषोत्तम असा पुत्र जन्म घेतो.
    10) तेराव्या रात्रीच्या गर्भधारणेमुळे वर्णसंकर अशी पुत्री जन्माला येते.
    11) चौदाव्या रात्रीच्या गर्भधारणेमुळे उत्तम पुत्र जन्माला येतो.
    12) पंधराव्या रात्रीच्या गर्भधारणेमुळे सौभाग्यवती होती मुलगी जन्माला येते.
    13) सोळाव्या रात्रीच्या गर्भधारणेमुळे सर्व गुणसंपन्न असा पुत्र जन्माला येतो.

       गरुड पुराणानुसार संतान प्राप्तीच्या दिवशी म्हणजेच गर्भधारणेच्या दिवशी स्त्री आणि पुरुष दोघांचे चित्त प्रसन्न आणि मन शुद्ध असावे कारण त्या दिवशी दोघांच्या मनात आणि चित्तामध्ये जे भाव उत्पन्न होतील त्याच प्रकारची संतान उत्पन्न होत असते.

    आशा करतो की मनोवांछित संतान प्राप्तीसाठी वरील माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. विविध शास्त्रांचा आणि ग्रंथाचा आधार घेऊन ही माहिती आपणासमोर सादर केली आहे. अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका.


मनोवांच्छित संतती / MANOWANCHHIT SANTATI #

आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.

Follow my YouTube channel

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.