27 नक्षत्र / 27 Nakshtra /27 नक्षत्रांविषयी संपूर्ण माहीतीआणि वैशिष्ट्य – 27 Nakshatra information in Marathi#
!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!
आज आपण नक्षत्रांविषयी माहिती पाहणार आहोत.आकाशात जे लहान मोठया आकाराचे तार्यांचे समूह दिसुन येतात त्यांनाच आपण नक्षत्र असे म्हणतो. पंचांगांमध्ये नक्षत्रांना खूप महत्त्व आहे भारतीय पंचांगाप्रमाणे एकूण 27 नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांची इष्ट देवता, गुणवैशिष्ट्य व इतर काही महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. वाचकांसाठी या लेखात नक्षत्रांची माहिती दिली असून कोणत्या नक्षत्रात कोणती कामे करावी हे दिले आहे. याचा उपयोग आमच्या वाचकांना झाल्याशिवाय राहणार नाही.
1) अश्विनी -
हे प्रथम क्रमांकाचे नक्षत्र असून याचा स्वामी गुरु आहे. या नक्षत्राचे स्वामित्व दक्षिण दिशेवर आहे. सदैव उद्योग हा या नक्षत्राचा गुण आहे. अश्विनी नक्षत्रावर नवीन दुकान चालू करणे, गुरे ढोरे घेणे, जमीन नांगरणे, विद्याभ्यास चालू करणे, औषधे सुरू करणे, मुलांचे नाक अगर कान टोचणे इत्यादी गोष्टी कराव्यात.
2) भरणी -
हे द्वितीय क्रमांकाचे नक्षत्र असून हे अधोमुख, उग्र आणि क्रूर असे नक्षत्र आहे. भरणी नक्षत्रावर लहान मुलांचे उष्टावन करणे, कलाक्षेत्रातील कामास सुरुवात करणे, घातपात अधिक कामे केली जातात. या राशीचा स्वामी मंगळ आहे
3) कृतिका -
कृती करीत राहणे हे या नक्षत्राचे खास वैशिष्ट्य आहे. हे अधोमुख व सुलोचन आहे. कृतिका नक्षत्रावर विहीर खणणे, तलाव खणणे, पुरलेले द्रव्य काढणे, गणिताच्या अध्ययनास प्रारंभ करणे, बी पेरणे, नांगरणे इत्यादी कृत्य करावेत. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे.
4) रोहिणी -
हे चार नंबरचे नक्षत्र असून हे नक्षत्र ऊर्ध्वमुख, ध्रुव, स्थिर व अंधलोचन आहे, या नक्षत्रावर घरे बांधणे, तोरणे बांधणे, बाग करणे, नगर प्रवेश करणे, अन्नग्रहण, अग्निहोत्र घेणे, मुलांचे नाक कान टोचणे, घराचा पाया खणणे, गर्भिनेने प्रसूती स्थानी प्रवेश करणे इत्यादी कामे करावे. या नक्षत्राचा स्वामी रवी आहे.
5) मृग-
मृग म्हणजे हरीण. हरणासारखे चपळ हे नक्षत्र आहे. हे नक्षत्र मृदू, मैत्र व मंद लोचन नक्षत्र आहे. या नक्षत्रावर पशु खरेदी करणे, नांगर धरणे, स्त्री संग, प्रयाण करणे, नवीन वस्त्र धारण करणे इत्यादी गोष्टी कराव्यात. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे.
6) आर्द्रा-
हे नक्षत्र दारून तीक्ष्ण आहे. तसेच अधोमुख व मध्यलोचनाही आहे. या नक्षत्रावर जारण मारणादी कामे, पेरणी, शिक्षणास सुरुवात, विहीर करण्यास प्रारंभ इत्यादी कृत्ये करावीत. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे.
7) पुनर्वसू -
हे नक्षत्र चर,चल व सुलोचन आहे. या नक्षत्रावर नवीन वाहना वर बसणे, नवीन वस्त्र धारण करणे, नाक टोचणे, मुलांचे नाव ठेवणे, प्रयाण करणे इत्यादी कृत्य करावेत. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे.
8) पुष्य-
हे नक्षत्र ऊर्ध्वमुख, लघु, अंधलोचन आहे. या नक्षत्रावर घर बांधणे, देवालय बांधणे, नवीन दुकान चालवणे, मुंजी करणे, विद्या अभ्यास करणे, नाक कान टोचणे इत्यादी गोष्टी कराव्यात. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे.
9) आश्लेषा-
हे तीक्ष्ण व दारुण नक्षत्र आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या मुलांची शांती करावी लागते. या नक्षत्रात विहीर खोदण्यास आरंभ करणे, द्युत खेळणे. मंत्र साधनेस सुरुवात करणे, गंधर्व विवाह इत्यादी गोष्टी कराव्यात. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे.
10) मघा-
क्रूर नक्षत्रात या नक्षत्राची गणना केली जाते. या नक्षत्रावर आश्लेषा नक्षत्रात दिलेल्या गोष्टींचा प्रारंभ करावा. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे
11) पूर्वा फाल्गुनी-
हे नक्षत्र उग्र आहे. या नक्षत्रात मघा नक्षत्रात सांगितलेलीच कृत्य करावी. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे.
12) उत्तरा फाल्गुनी-
उर्ध्वमुख, स्थिर असे हे नक्षत्र आहे, या नक्षत्रावर घर बांधणे, जीर्णोद्धार करणे, बाग बगीचा लावणी, औषधी वनस्पती लावणे, द्रव्य देणे व ठेवणे, घराचा पाया खणणे इत्यादी कृत्य करावेत. या नक्षत्राचा स्वामी रवी आहे.
13) हस्त -
हत्तीचे नक्षत्र म्हणून हे ओळखले जाते. हे नक्षत्र लघु, मंदलोचन आहे. हस्त नक्षत्राचा पाऊस सर्व परिचयाचाच आहे. या नक्षत्रावर जनावर घेणे, दुकान घालने, बी पेरणे, शिल्पकाम करणे, नाक कान टोचणे, मौजी बंधन, विवाह करणे, मुलांचे नाव ठेवणे इत्यादी कामे करावीत. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे.
14) चित्रा-
हे मृदू, मध्यलोचन नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. या नक्षत्रात हरवलेले वस्तू सापडणे कठीण आहे. वस्तू दुसऱ्याच्या हाती जाते.
15) स्वाती-
हे मृदू, मध्यलोचन नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. या नक्षत्रात हरवलेले वस्तू सापडणे कठीण आहे. वस्तू दुसऱ्याच्या हाती जाते.
15) स्वाती-
हे सुलोचन नक्षत्र आहे. मुलांचे नाव ठेवणे, नाक कान टोचणे, शेतीसंबंधी कामे करणे, जनावरांची खरेदी करणे, नवनवीन वस्त्रालंकार बनविणे, बाळंतीला स्नान घालने यासारखे कर्म करावीत. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे.
16) विशाखा-
हे अधोमुख व अंध नक्षत्र आहे. या नक्षत्रावर पुरलेले द्रव्य काढणे, विहीर खणणे, नांगरणे, बी पेरणे, दत्तक घेणे, अग्निहोत्र धारण करणे ही कृत्य करावीत. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे.
17) अनुराधा-
हे नक्षत्र मृदू आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. या नक्षत्रावर जनावरे घेणे, गायन प्रारंभ करणे, विवाह, गांधर्व विवाह करणे, औषधी झाडे लावणे, मुलांचे नाव ठेवणे, शेतीची कामे करणे इत्यादी कामे करावी.
18) ज्येष्ठा-
हे नक्षत्र तीक्ष्ण व दारुण आहे. या नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाची शांती करावी. या नक्षत्रावर जनावर घेणे, जमीन नांगरणे, मंत्र साधना करणे, बाळंतीला स्नान घालणे इत्यादी कृती करावीत. या नक्षत्राचा स्वामी शनि आहे.
19) मूळ-
हे नक्षत्र अधोमुख, दारुण व सुलोचन आहे. मूळ नक्षत्रावर जन्म घेणाऱ्या बालकाची नक्षत्र शांती करावी लागते. या नक्षत्रावर भेदनीतीची कामे, कृष्णकारस्थाने, कपट कामे, जारण मारणादी कृत्य करावीत. या नक्षत्राचा स्वामी शनी आहे.
20) पूर्वाषाढा-
हे नक्षत्र अधोमुख व क्रूर आहे. या नक्षत्रावर घातपात कृत्य करणे, विषारी प्रयोग करणे, विहीर खोदणे, शेतकाम प्रारंभ करणे इत्यादी कृती करावीत. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे.
21) उत्तराषाढा-
हे उर्ध्व, स्थिर व मंदलोचन नक्षत्र आहे. या नक्षत्रावर देवालय बांधणे, घर बांधणे, विहीर खणणे, बी पेरणे, शांती कर्म साधना, विवाह, अग्निहोत्र, द्रव्य देणे घेणे, नृत्य शिकवण्यास आरंभ करणे, मुलांचे नाक कान टोचणे इत्यादी गोष्टी कराव्या. या नक्षत्राचा स्वामी रवी आहे.
22) श्रवण-
हे उर्ध्वमुख, चल व चर असे नक्षत्र आहे. या नक्षत्रावर नवीन यंत्र किंवा कारखाना यांचे उद्घाटन करणे, सहली काढणे, वनविहार करणे, धार्मिक समारंभ करणे, घर बांधण्यास प्रारंभ करणे इत्यादी गोष्टी कराव्यात. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे.
23) धनिष्ठा-
हे उर्ध्वमुख, चल, अंधलोचन नक्षत्र आहे. या नक्षत्रावर देवालय बांधणे, सार्वजनिक कामे करणे, नवीन संशोधन करणे, गुड विद्येचा अभ्यास, अध्यात्मशास्त्राचे वाचन, चिंतन, मनन करणे, मुलांचे नाव ठेवणे इत्यादी कामे करावेत. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे.
24) शततारका-
हे नक्षत्र उर्ध्वमुख चल, मंदलोचन आहे. या नक्षत्रावर घरे, देवालय बांधणे, राज्याभिषेक करणे, जनावरे घेणे, जमीन नांगरणे, नाक कान टोचणे इत्यादी कामे करावे. या नक्षत्राचा स्वामीचंद्र आहे.
25) पूर्वा भाद्रपदा-
हे अधोमुख उग्र, वक्र असे नक्षत्र आहे. या नक्षत्रावर पूर्वाषाढा नक्षत्राची दिलेली कामे करावीत. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे.
26) उत्तरा भाद्रपदा-
हे स्थिर व सुलोचन नक्षत्र आहे. या नक्षत्रावर उत्तरा नक्षत्रात सांगितलेली कामे करावीत. या नक्षत्राचा स्वामी रवी आहे.
27) रेवती-
हे शेवटचे नक्षत्र आहे. हे मृदू, मैत्र आहे. या नक्षत्रावर गायन वादन करणे, करमणुकीची कामे, रतिक्रीडा करणे, काव्य नाट्य यांचा अभ्यास करणे, चैनीच्या वस्तू घेणे, घराचा पाया खणने, घर बांधणे यासारख्या गोष्टी कराव्यात. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे.
27 नक्षत्रांविषयी संपूर्ण माहीती,महत्व आणि वैशिष्ट्य –
27 Nakshatra information in Marathi#
Frequently asked Questions:
1) नक्षत्र कशाला म्हणतात?
2) नक्षत्रे किती आणि कोणकोणती आहेत?
अधिक लेख-
आमच्या पोस्ट आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन लेख सर्वप्रथम आपणास वाचावयास मिळतील.
Follow my YouTube channel
Post a Comment