छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती | Information about Shivaji Maharaj#
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती Information about Shivaji Maharaj#
आजवर शिवाजी महाराजांविषयी अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या चरित्रावर आधारित विविध पुस्तके, कादंबऱ्या देखील प्रसिद्ध झाल्या. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशा, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्र इत्यादी वांग्मयाचे जेवढे प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी महाराज व शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध चित्रपट निघाले त्याचबरोबर व्याख्यानेही खूप झालीत. पण एवढे सगळे होऊन देखील शिवकालाचे व शिवाजी महाराजांची योग्य प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे असे वाटत नाही.
आजवर वंशपरंपरेने झालेले भरपूर राजे आपण पाहिलेत परंतु शिवाजी महाराज हे वारसा हक्काने झालेले राजे नव्हते शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि ते संस्थापक झाले इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे व स्वतः स्वराज्य निर्माण करणे यात फार मोठे अंतर आहे. ज्या काळात स्वतंत्र जगणं देखील असंही होतं त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची इच्छा मनात बाळगली आणि त्यानुसार त्यांनी विविध योजना आखल्या व स्वराज्य निर्माण केले
शिवाजी महाराज हे धर्मनिष्ठ राजे होते त्यांचे धर्मावर खूप श्रद्धा होती आणि त्यानुसार ते वागत असत देवदेवतांना साधुसंतांना ते पुजत होते धर्मासाठी व मंदिरांसाठी ते दानधर्म करीत होते इतर धर्माविषयी देखील त्यांना आदर होता त्यांनी स्पष्ट म्हटले होते की ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा यात कोणी हस्तक्षेप करू नये राजा म्हणून त्यांनी प्रजेत धर्मावरून कधीच भेद केलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. ते शूर शासक होते, ज्याच्याकडे ३०० किल्ले आणि सुमारे १ लाख सैनिकांचे प्रचंड सैन्य होते. त्यांनी आपल्या सैन्याची खूप काळजी घेतली. आपल्या प्रजेचे मन महाराज ओळखत होते. प्रजेचे सुख-दुखः यांची जाणीव महाराजांना होती. म्हणूनच त्यांना जाणता राजा असे संबोधल्या जाते. महाराजांचे मावळे म्हणजे अठरापगड जातींतील लोक.
3 एप्रील 1680 मधे (वयाच्या ५० व्या वर्षी) प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची तब्येत खालावत गेली आणि रायगडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी पुतळाबाई महाराजांच्या चितेवर सती गेल्या एक उत्तम शासक एक उत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज कायम आपल्या मनात राहतील.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती | Information about Shivaji Maharaj#
Frequently asked questions on Shivaji Maharaj -शिवाजी महाराजांवर नेहमी विचारलेले जाणारे प्रश्न
1) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला…?
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०
2) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)
3) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड
4) छत्रपती शिवाजी महाराजांनी…….. किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा
5) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड6) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४
7) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई आणि वडिलांचे नाव काय?
उत्तर: आई : राजमाता जिजाऊ, वडील : शहाजीराजे भोसले.
8) शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु कोण होते?
उत्तर: आई : राजमाता जिजाऊ, वडील : शहाजीराजे भोसले.
उत्तर: समर्थ रामदास स्वामी.
9) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण
10) शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर: 3 एप्रिल 1680 रायगढ़
Post a Comment