रुद्राक्ष महिमा ! Rudraksha Mahima #
रुद्राक्ष महिमा ! Rudraksha Mahima #
भागवत धर्माच्या उपासकांच्या दृष्टीने तुळशीच्या माळीचे फार महत्त्व आहे. त्यांच्या गळ्यात नियमित तुळशीच्या 108 मण्यांची माळ असते. त्याप्रमाणे जे शैव पंथाचे म्हणजेच भगवान शंकर यांची उपासना करणारे जे लोक असतात त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेली असते. रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे डोळा. यावरूनच रुद्राक्ष म्हणजे प्रत्यक्ष शिवशंकरच आहेत असे समजले जाते. शंकरांचा स्वभाव हा अतिशय भोळा असून त्यांची जो कोणी उपासना करेल त्याचे हेतू किंवा योजनांचा विचार न करता त्याच्यावर प्रसन्न होऊन ते त्याला हवा असलेला वर देऊन मोकळे होतात. शंकराचे पूजन सर्वांनी अवश्य करावे व रुद्राक्ष धारण करावा. शिवलीलामृत या पोथी मध्ये रुद्राक्ष संबंधी संपूर्ण एक अध्याय लिहिलेला आहे अकराव्या अध्यायामध्ये संपूर्ण रुद्राक्ष महिमा सांगितलेली आहे.
पूर्वी महानंदा नावाची वारांगणा होती. तिच्याकडे कुकुट आणि मर्कट होते. महानंदा त्यांना रुद्राक्ष घालून गाणे म्हणण्यास व नाच करण्यास शिकवीत असे. तिची परीक्षा घेण्याकरता एकदा साक्षात शंकर रूप पालटुन गिऱ्हाईक म्हणून आले. त्यांनी महानंदा बरोबर तीन दिवस सोबत राहण्याचा करार केला. भगवान शंकरांनी आपले आत्मलिंग काढून तिच्या जवळ दिले व त्यांनी तिला बजावून सांगितले की ते आत्मलिंग तू जीवापलीकडे सांभाळ. काहीही कारणाने ते जर जळाले किंवा भंगले तर मी स्वतः अग्नी प्रवेश करून घेईन.
शंकरांना तिची परीक्षा घ्यायची होती म्हणून तिला कळणार नाही अशा प्रकारे तिचे घरच पेटवून दिले. त्यावेळी ती आपल्या शयन कक्षात मंचावर झोपली होती. ती जागी झाली तेव्हा आपल्या घराला आग लागली असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने कुकुट व मर्कट या दोघांना प्रथम मुक्त करून आगीपासून त्यांना वाचवले. तोपर्यंत आगीच्या जोराने आत्मलिंगालाही वेढून टाकले. ते दग्ध झालेले शंकराने पाहिले त्याचबरोबर शंकरांनी महानंदाला सांगितल्याप्रमाणे त्या आगी मध्ये स्वतः ऊडी घेतली. शंकराने अग्नीत उडी घेतली आहे असे पाहताच महानंदानेही त्या पाठोपात अग्नीत उडी घेतली. महानंदाने अग्नीत प्रवेश केलेला पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी महानंदाचा उद्धार केला. तिच्याकडे असलेल्या कुकुट व मरकट या दोघांना पुढच्या जन्मी एकास राजपुत्राचा तर दुसऱ्यास प्रधान पुत्राचा जन्म मिळाला.
आधीच्या जन्मात महानंदा कडून त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमुळे त्यांना रुद्राक्ष हे जास्तच आवडू लागले होते. रुद्राक्षाच्या पुढे अनेक बहुमूल्य वस्तू सुद्धा त्यांना तुच्छ वाटू लागल्या होत्या. असा हा रुद्राक्षाचा महिमा आहे.
रुद्राक्ष हे एक रत्नच आहे. इतर रत्नांचे जसे गुणधर्म आहेत त्याचप्रमाणे रुद्राक्षाचे सुद्धा आहेत. आपल्या शरीरावर रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीची अध्यात्मिक उंची मोठ्या प्रमाणात वाढते. त्याचप्रमाणे शरीरावर रुद्राक्ष धारण केल्याने धारण करणाऱ्याच्या प्रापंचिक जीवनातील अडचणी सुद्धा दूर होण्यास मदत होत असते. अशी अद्भुत शक्ती रुद्राक्ष मध्ये आहे.
रुद्राक्षाच्या मुखावरून त्याचे 14 प्रकार आहेत. प्रत्येक मुखाचा रुद्राक्षाचे महात्म्य व गुणधर्म थोडे थोडे वेगळे आहेत. सर्वात श्रेष्ठ स्थान एक मुखी रुद्राक्षाचे मानण्यात आले आहे. एकमुखी रुद्राक्ष हे साक्षात शंकराचे स्वरूप आहे असे समजण्यात येते. एक मुखी रुद्राक्ष जी व्यक्ती आपल्या शरीरावर धारण करते त्या व्यक्तीला भरपूर मनःशांती लाभते त्याचबरोबर त्याच्या मनाची एकाग्रता अतिशय उत्तम प्रकारे साधली जाते. रुद्राक्ष शरीरावर धारण केल्याने आपण करीत असलेली उपासना ही निश्चित मार्गाकडे वळविली जाते. पण एक मुखी रुद्राक्ष फार दुर्मिळ असल्याने सहजासहजी मिळत नाही. या रुद्राक्षाच्या खरेदी प्रसंगी फसवणूक होण्याची अधिक शक्यता असल्याने विकत घेताना अत्यंत सावधानता बाळगून काळजीपूर्वक परीक्षा करून खात्री करून आपली फसवणूक टाळावी.
रुद्राक्ष कोणी, कोणते व कशा प्रकारे वापरावे याचे सविस्तर विवेचन शिवलीलामृत या ग्रंथामध्ये व्यवस्थित दिले आहे.
- काही आयुर्वेदिक उपाय Health Tips | आरोग्य संबंधी माहिती
- भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#
- राम नामाचे महत्व
Post a Comment