साडेसाती म्हणजे काय? | शनीची साडेसाती | Shani Sadesati #
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात साडेसातीचा काळ असतो. हा काळ साडेसात वर्षांचा असल्याने त्याला साडेसाती असे म्हणतात. या साडेसात वर्षांच्या काळात कोणकोणत्या आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागणार आहे? कोणकोणती संकटे आपल्यासमोर येऊन उभे राहणार आहेत? या संकट, अडचणी, आपत्तीमुळे हानी होणार आहे? आपल्या प्रतिष्ठेचे काय होणार आहे? इत्यादींसारख्या चिंता माणसाच्या मनात घर करून राहतात. वास्तविक पाहता साडेसाती या शब्दाचा जेवढा मानसिक धक्का किंवा धसका आपण घेतो तेवढा तो घेण्याची गरज नसते. साडेसाती म्हणजे नेमके आहे तरी काय? हे समजावून घेतल्यानंतर हे म्हणणे तुम्हाला निश्चित पटेल
पण जर शनि तुमचे काढून घेऊ लागला त्यामुळे तुमचे नुकसान होऊ लागले तर मात्र आपण पटकन शनीला दोष देऊन मोकळे होतो. शनीचा एक स्वभाव आहे तो म्हणतो तुमची जेव्हा चांगली परिस्थिती येते, तुमचा फायदा होत असतो, तुम्हाला भरपूर सुख मिळत असते तेव्हा तुम्हाला माझी अजिबातच आठवण येत नाही मात्र संकटे, अडचणी, आपत्ती येऊ लागल्या, नुकसान होऊ लागले की, लगेच माझी आठवण येते मग उपाय करायला लागतात.
व्यक्तीच्या पत्रिकेप्रमाणे त्याची जी रास असते त्या राशीच्या मागील राशीत शनी आला म्हणजे साडेसातीचा काळ सुरू होतो आणि आपल्या राशीच्या पुढची रास ओलांडून शनी गेला की साडेसातीचा काळ संपतो. शनीचे वास्तव्य एका राशीत अडीच वर्ष असते. आपली स्वतःची रास, मागची एक रास व पुढची एक रास अशा तीन राशी ओलांडून जाण्यास शनी ग्रहाला एकूण साडेसात वर्ष लागत असतात.
- या काळात सर्वांशी गोडी गुलाबीने वागावे.
- अवास्तव अवाजवी खर्च करू नये
- आपली स्वतःची व घरातील इतरांची प्रकृती बिघडणार नाही याची काळजी घेऊन वेळीच औषध उपचार करून घ्यावा
- मोठे धाडसाचे काम स्वतः होऊन अंगावर घेऊ नये
- या काळात कोणासही मोठी रक्कम उसने देऊ नये
- या काळात शक्यतो कोर्टकचेरीचे कामे टाळणे चांगले असते
- या काळात कोणाशी वैर ठेवून भांडण करू नये
- या काळात आपले मन डळमळू न देता मन खंबीर ठेवून शांतचित्ताने व पूर्ण विचार करूनच कुठलीही गोष्ट करा.
* साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय *
- शनि महात्म्याची पोथी वाचून शनिवारी उपास करावा
- मारुतीचे दर्शन घेऊ मारुतीचे दर्शन घ्यावे व मारुती सृईच्या पानांची माळ घालावी
- एका वाटीत गोड तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहावा व तेथील मारुती घालावे
- शक्य झाल्यास पुढील ग्रंथांचे वाचन करावे-- हनुमान चालीसा नवनाथ पोथी शिवलीलामृत पोथी व शिव स्तोत्र
- काळे कपडे वापरू नयेत.
- घोड्याच्या पायाची नाळ मिळाल्यास त्याची स्थापना करून नेहमी पूजा करावी.
- मारुती रुद्राचा अभिषेक करावा .
- जेवढा जास्त होईल तेवढा नवग्रह स्तोत्रातील शनीचा जप करावा
याप्रमाणे वर दिलेल्या उपायांपैकी जेवढे जमतील तेवढे उपाय करावेत त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होईल साडेसाती अटळ असल्याने तिला न भिता न घाबरता खंबीर मनाने व शांतचित्ताने त्याचबरोबर निग्रहाने सामोरे जावे.
शनि मंत्र | Shani Mantra
1) ऊँ शं शनैश्चराय नम:
2) ऊँ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः
3) ॐ नीलाजंन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छाया मार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्.
साडेसाती संदर्भात प्रश्न -
- मनोवांच्छित संतती / MANOWANCHHIT SANTATI #
- भक्त कसा असावा ? भक्ताची लक्षणे. / Types Of Devotees#
- कर्मयोग
- काही आयुर्वेदिक उपाय Health Tips | आरोग्य संबंधी माहिती
- पती पत्नीतील वाद व त्यावरील उपाय / Pati Patni madhil Vaad Ani Upay #
- पती आणि पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी व नाते टिकवण्यासाठी उपाय # Husband Wife Relation #
- पति कसा असावा? |आदर्श पतीची लक्षणे| Essential Qualities Of a Good Husband #
- वडील | बाप | जनक | पिता | बाबा |- Father #
Post a Comment