व्यभिचार: एक सामाजिक आणि नैतिक आव्हान/ Adultery, Incest, Immorality#
व्यभिचार: एक सामाजिक आणि नैतिक आव्हान/
Adultery, Incest, Immorality #
व्यभिचार हा एक गंभीर सामाजिक आणि नैतिक विषय आहे, जो वैवाहिक नातेसंबंधांमध्ये विश्वासघाताचा प्रकार म्हणून ओळखला जातो. संस्कृती, धर्म, आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून व्यभिचार हे भिन्न प्रकारे परिभाषित केले जाते. परंतु, एक समान मुद्दा असा आहे की तो वैवाहिक किंवा सहजीवनाच्या नात्यातील निष्ठेचा भंग करतो.
सध्याच्या युगात व्यभिचाराचे प्रमाण खूप वाढलेले आहे. नैतिक मूल्यांचे आणि धार्मिक मूल्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पायमल्ली होत आहे अन त्यामुळेच बऱ्याच लोकांचे वैवाहिक जीवन हे दुःख सागरात बुडालेले आहेत काहींचा संसार उध्वस्त झाला. व्यभिचार म्हणजे नेमकं काय? तर विवाहित स्त्रीने अथवा पुरुषाने आपल्या जीवनसाथी व्यतिरिक्त इतर श्री अथवा पुरुषाशी ठेवलेले संबंध म्हणजे व्यभिचार होय. तसे पाहिले तर वैवाहिक संबंध हा शास्त्राला अनुसरून, धार्मिक, नैतिक आणि कायदेशीर स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे त्याला समाजात प्रतिष्ठा आणि मान्यता आहे.
विवाह झालेल्या पुरुषाने अथवा स्त्रीने अन्य स्त्री किंवा पुरुषाशी व्यभिचार करणे म्हणजेच समागम करणे या कृतीला धर्मशास्त्रात "जारकर्म" असे म्हटले गेले आहे. मनुस्मृतीत आणि धर्मशास्त्रात याला पातक समजून कडक शिक्षा सांगितल्या आहेत. यामागे दुसरे तिसरे काही कारण नसून विवाह संस्थेचे संरक्षण व्हावे हाच हेतू आहे. हिंदू विवाह कायद्याप्रमाणे व्यभिचारी व्यक्तीला सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा या कारणामुळे घटस्फोट मिळू शकतो. परंतु पाश्चात्य देशातल्या विद्वानांनी या हिंदू समाज व्यवस्थेवर व व्यभिचारावर लागू असलेल्या शिक्षेवर आक्षेप घेतले होते.एखाद्या वैवाहिक पुरुषाने पर स्रीला स्पर्श करणे, तिच्यासोबत हसणे किंवा संभाषण करणे इत्यादी कृत्यांना कौटिल्यांनी मानस व्यभिचार असे म्हटले आहे.
हे ही वाचा- भ्रष्टाचार- एक समस्या / Corruption/ Types of corruption #
व्यभिचाराची व्याख्या आणि त्याचे स्वरूप :
व्यभिचार म्हणजे काय तर वैवाहिक जोडीदाराच्या संमतीशिवाय किंवा त्याला नकळत इतर व्यक्तीसोबत लैंगिक किंवा भावनिक नाते किंवा संबंध ठेवणे होय. व्यभिचाराला अनेकदा कौटुंबिक नातेसंबंधांमधील संकटाचे मूळ मानले जाते. त्याचे स्वरूप पुढील प्रकारे दिसून येते:
- भावनिक व्यभिचार: जोडीदाराची भावनिक गरज भागविण्यासाठी इतरांशी जवळीक किंवा संपर्क वाढवणे.
- शारीरिक व्यभिचार: जोडीदाराशिवाय इतर व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणे.
व्यभिचाराचे परिणाम :
व्यभिचारा मुळे मानवी जीवनावर वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक परिणाम होतात आणि हे परिणाम अत्यंत गंभीर असतात. त्यातील काही परिणाम आपण पुढील प्रमाणे पाहू शकतो.
- विश्वासघात: वैवाहिक जीवनात विश्वास खूप महत्त्वाचा असतो परंतु व्यभिचारामुळे नातेसंबंधातील विश्वास नष्ट होतो, जो पुन्हा मिळवणे कठीण होते.
- कौटुंबिक तणाव: व्यभिचारामुळे कौटुंबिक विघटन होण्याची शक्यता वाढते. कुटुंबात ताण त्यांना वाढतात आणि त्याचा परिणाम म्हणून विशेषतः, मुले भावनिकदृष्ट्या प्रभावित होतात.
- मानसिक आरोग्य: व्यभिचारामुळे वैवाहिक जीवनातील चांगले संबंध तुटतात आणि संबंध तुटल्यामुळे चिंता, नैराश्य निर्माण होते त्यामुळे आत्मविश्वास कमी होण्याचे प्रकार दिसून येतात. आत्मविश्वास कमी झाल्यामुळे मानसिक खच्चीकरण होते
- सामाजिक परिणाम: समाजात व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीकडे नकारात्मक दृष्टीकोन ठेवला जातो, ज्यामुळे त्या व्यक्तीला सामाजिक पृथक्करणाचा सामना करावा लागू शकतो.
व्यभिचार टाळण्यासाठी उपाय :
- प्रामाणिक संवाद: जोडीदारांमध्ये प्रामाणिक व खुला संवाद असणे महत्त्वाचे आहे. यामुळे गैरसमज दूर होतात.
- नात्यात पारदर्शकता: नातेसंबंधात विश्वास टिकवण्यासाठी दोघांनीही आपली प्राधान्ये आणि भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी नात्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे
- समुपदेशन: नातेसंबंधांमध्ये अडचणी आल्यास तज्ञांशी सल्लामसलत करणे फायदेशीर ठरते.
- नैतिक शिक्षण: लहानपणापासून नैतिक मूल्ये आणि नात्यांबाबत जबाबदारी शिकविणे गरजेचे आहे.
कायदेशीर बाजू :
काही देशांमध्ये व्यभिचाराला गुन्हा मानले जाते, तर इतरत्र हा केवळ वैयक्तिक किंवा नैतिक विषय मानला जातो. भारतात, 2018 पर्यंत व्यभिचार भारतीय दंड संहितेच्या कलम 497 अंतर्गत गुन्हा होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या कलमाला रद्द करून, व्यभिचार हा फक्त विवाहातील व्यक्तींमधील वैयक्तिक बाब असल्याचे ठरवले.
सारांश :
व्यभिचार हा नातेसंबंधांवर गंभीर परिणाम करणारा मुद्दा आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने निष्ठा, आदर, आणि परस्पर विश्वासाच्या तत्त्वांवर आधारलेली मूल्यव्यवस्था स्वीकारली पाहिजे. नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी संवाद, पारदर्शकता, आणि परस्पर आदर आवश्यक आहे. त्यामुळे नाती अधिक मजबूत होतील आणि समाजात चांगले वातावरण निर्माण होईल.
व्यभिचार: एक सामाजिक आणि नैतिक आव्हान/ Adultery, Incest, Immorality#
अधिक लेख-
Post a Comment