जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

चंपाषष्ठी : संपूर्ण माहिती | Information of Champashasti#

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

चंपाषष्ठी : संपूर्ण माहिती | Information of Champashasti#

चंपाषष्ठी : संपूर्ण माहिती| Information of Champashasti#

    नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण एका विशिष्ट तिथी बद्दल जाणून घेणार आहोत आणि त्या विशिष्ट तिथीचे नाव आहे चंपाषष्ठी. चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील पारंपरिक सण असून, तो विशेषतः मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध षष्ठीला साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी. हा दिवस श्रीखंडोबा किंवा खंडेरायाच्या पूजेसाठी ओळखला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी हा काळ महाराष्ट्रात खंडोबाचे नवरात्र म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र, कर्नाटक, आणि गोव्यातील अनेक भक्त खंडोबाला आपला कुलदैवत मानतात. चंपाषष्ठी हा सण मुख्यतः खंडोबाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा आहे, कारण हा त्याचा विवाहसोहळ्याचा किंवा मनी आणि मल्ल राक्षसांचा वध केल्याचा दिवस मानला जातो.

चंपाषष्ठीची कथा:

    पुराणकथेनुसार, मणी आणि मल्ल या दोन राक्षसांनी पृथ्वीवर आतंक माजवला होता. त्यांच्या अन्याय आणि अत्याचाराने संपूर्ण सृष्टी त्रस्त झालेली होती. त्यांनी अन्याय अत्याचाराचे हद्दच पार केली होती. देव, ऋषी आणि मानव यांना भयंकर त्रास दिला. हा त्रास असह्य झाल्याने ऋषीमुनींनी, देवतांनी भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले व या दोन्ही राक्षसांचा बंदोबस्त करावा ही विनंती केली. भगवान शंकर आपल्या खडगासह मनी मल्लाचा वध करण्यास आले त्या खडगाचे खंडा असे नाव होते. भगवान शिव शंकरांचा हा अवतार खंडा मंडित झाला म्हणून त्यांना खंडोबा असे नाव पडले. शंकराने खंडोबा या रूपात प्रकट होऊन या दोन्ही राक्षसांचा वध केला. हे युद्ध सहा दिवस चालले. मणी आणि मल्ल यांनी मृत्यूपूर्वी खंडोबाला विनंती केली की, त्यांच्या नावाने खंडोबा यांची पूजा केली जावी. खंडोबाने त्यांना वरदान दिले आणि तेव्हापासून खंडोबाला मल्हारी हे नाव पडले. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला खंडोबा ने दोन्ही असूरांचा नायनाट करून विजय मिळवला म्हणून हा दिवस चंपाषष्ठी म्हणून साजरा केला जातो.

चंपाषष्ठी सणाचे स्वरूप:

    मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी हा काळ खंडोबाचे नवरात्र म्हणून ओळखला जातो. या सहा दिवसांच्या काळात नवरात्र प्रमाणेच फुलांच्या माळा चढवल्या जातात. सहा दिवस नंदादीप तेवत ठेवला जातो तसेच घटी देखील बसवले जाते. या सहा दिवसांच्या काळात मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे वाचन केले जाते. शेवटच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते. भक्तगण खंडोबाला हलदी-कुंकू वाहतात. खंडोबाच्या उपासनेत हळद म्हणजेच भंडारा खूप महत्त्वाचा असतो सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार आशा घोषणा देत हा भंडारा उधळला जातो काही ठिकाणी धान्य, नारळ, फळे आणि नैवेद्य अर्पण केला जातो. गावरान जेवण म्हणजेच वांग्याचे भरीत आणि भाकरी, रोडगा, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात. देवाला चढवलेल्या नैवेद्याचे काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून दिले जातात. रात्रभर भजन-कीर्तनांचे आयोजन केले जाते आणि त्यानंतर खंडोबाची तळी भरले जाते. तळी भरून झाल्यावर दिवटी व बुधली हातात घेऊन आरती केली जाते.

हे वाचा : कुलदेवी आणि कुलाचार | Kuldevi Ani Kulachar#

उत्सवाचे महत्त्व:

    चंपाषष्ठी हा सण भक्तांमध्ये शौर्य, निष्ठा आणि भक्ती यांचे प्रतीक मानला जातो. खंडोबाची पूजा केल्याने संकटांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. चंपाषष्ठी हा भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती, आणि विजयाचा उत्सव आहे. हा सण धर्म आणि समाजासाठी न्यायाचे प्रतीक मानला जातो. खंडोबाची कृपा लाभावी यासाठी या दिवशी विशेष प्रार्थना केली जाते.

उत्सवाची वैशिष्ट्ये:

    चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील खंडोबाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. या उत्सवाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • खंडोबाच्या विजयाचा उत्सव :
    • मनी आणि मल्ल या राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडोबाने सहा दिवसांची युद्धयात्रा केली होती. शेवटच्या दिवशी (षष्ठी) विजय मिळाला, म्हणूनच चंपाषष्ठी हा विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

  • उपवास आणि भक्ती :
    • भक्त उपवास करून खंडोबाची उपासना करतात. काही जण फक्त फळे व पाणी घेऊन उपवास पाळतात, तर काही भक्त नवरात्रासारखा सहा दिवसांचा उपवास करतात.

  •  विशेष पूजाविधी
    • खंडोबाच्या मंदिरात अभिषेक, पूजा, आणि हळदी-कुंकवाचा सोहळा आयोजित केला जातो.
    • हळदीचा वापर हा या पूजेमध्ये खास वैशिष्ट्य आहे. हळद फेकून "जय मल्हार!" असा जयघोष केला जातो.
  • जागर सोहळा
    • काही ठिकाणी रात्री जागरण केले जाते, ज्याला जागर म्हणतात. यामध्ये खंडोबाचे पराक्रम कथन केले जातात.
    • भजने, गवळण, आणि पोवाड्यांद्वारे खंडोबाच्या गाथेचे गायन केले जाते.
  • पालखी सोहळा
    • जेजुरीसारख्या प्रमुख खंडोबा मंदिरांमध्ये पालखी काढली जाते.
    • भक्त खंडोबाच्या पालखीचे दर्शन घेतात आणि त्या मागे जयघोष करीत चालतात.
  • हळदीचा रंगोत्सव
    • चंपाषष्ठीच्या दिवशी हळदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
    • जेजुरीसारख्या ठिकाणी मंदिर परिसरात हळदी फेकण्याचा सोहळा असतो, ज्यामुळे परिसर सोन्यासारखा दिसतो.
  • खंडोबाच्या लढाईचे नाट्यरूप दर्शन
    • काही ठिकाणी खंडोबा आणि राक्षसांच्या लढाईचे नाट्यरूप सादरीकरण होते.
    • यात खंडोबाचे पराक्रम आणि त्यांच्या साथीदारांच्या साहाय्याने मिळवलेला विजय सादर केला जातो.
  • भक्तांची गर्दी आणि एकोपा
    • चंपाषष्ठीला जेजुरीसारख्या प्रमुख मंदिरांमध्ये लाखो भक्तांची गर्दी असते.
    • विविध भागांतून आलेले लोक या सणात सामील होऊन आपसात एकात्मता दर्शवतात.
  • पारंपरिक भोजन
    • उपवास संपवून भक्त पारंपरिक महाराष्ट्रीय भोजन करतात, ज्यामध्ये पुरणपोळी, भाजी, आणि मसालेदार पदार्थांचा समावेश असतो.
  • माळकरी भक्तांची परंपरा
    • खंडोबाचे माळकरी भक्त या दिवशी विशेष सेवा करतात. माळकरी हे पारंपरिक पोशाख, भगवी टोपी आणि गळ्यात खंडोबाची माळ घालून उत्सवात सहभागी होतात.

उपसंहार:

    चंपाषष्ठी हा सण भक्तांच्या जीवनात आनंद, भक्ती आणि परंपरेचे महत्त्व वाढवतो. खंडोबाच्या लीला आणि त्याचा इतिहास यामुळे हा सण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत महत्त्वाचा ठरतो.

चंपाषष्ठी:संपूर्ण माहिती | Information of Champashasti# 

इतर लेख -

    तर मित्रांनो वरील लेखात आम्ही चंपाषष्ठी बद्दल सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमच्या कडे Champashasti# बद्दल आजून काही माहिती असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.

आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास, जरूर कळवा! 😊

Follow my YouTube channel


No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.