गुरुचरित्र ग्रंथाविषयी माहिती | Information About GURUCHARITRA#
गुरुचरित्र ग्रंथाविषयी माहिती | Information About GURUCHARITRA#
गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे जो श्रीगुरुदत्तात्रेयांचे अवतार मानल्या गेलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनरसिंहसरस्वती यांचा जीवनचरित्र आणि उपदेश यांचे वर्णन करतो. हा ग्रंथ दत्त संप्रदायामध्ये अत्यंत आदरणीय मानला जातो. याचे लेखन 15व्या शतकात श्रीसरस्वती गंगाधर यांनी केले असल्याचे मानले जाते. नृसिंह सरस्वती, ज्यांचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये बारकाईने केला गेला आहे, हे गुरु म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहेत. सरस्वती गंगाधर, जे श्रीनृसिंह सरस्वतींचे एक शिष्य होते. ते सायंदेव यांच्या पाचव्या पिढीत येतात. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश आहे. सायंदेव - नागनाथ - देवराव - गंगाधर - सरस्वती गंगाधर अशी वंशपरंपरा गुरुचरित्रात दिली आहे. सरस्वती गंगाधर हे ‘गुरुचरित्रा’चे कर्ते. त्यांनी आपली माहिती देताना म्हटले आहे,
"आपस्तंब शाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि ।
साखरें नाम ख्यातीसी । सायंदेवा पा साव ॥’ (गुरुचरित्र १.४१)
यावरून ग्रंथकर्त्याचे उपनाव म्हणजे आडनाव ‘साखरे’ असून ते आपस्तंब शाखेचे कौंडिण्य गोत्री ब्राह्मण होते.अत्यंत दिव्य आणि दैवी परंपरेने परिपूर्ण असलेला मूळ ग्रंथाचा सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र होय.
गुरुचरित्र ची सुरुवात सिद्ध व नामधारक यांच्या संवादातून होते. त्यातूनच गुरुचरित्र हा ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे श्रीनृसिंहसरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर होय अशी या सांप्रदायाचे दृढ श्रद्धा आहे. पुरावा द्यायचा म्हटला तर, गंगाधरांचा पुत्र सरस्वती संसाराचा म्हणजेच प्रपंचाचा त्याग करून मनशांती मिळवण्यासाठी गाणगापूरच्या दिशेने जातो. चालून चालून थकल्यानंतर तो एका वृक्षाखाली निद्राधीन होतो. त्यावेळेस निद्रावस्थेमध्ये त्याला एका दिव्य अशा तेजामुर्तीचे दर्शन घडते. तो जागा होऊन स्वप्नात दिसलेल्या दिव्यमूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागतो. पुढे गेल्यानंतर सिद्धनाथ नामक जी मूर्ती त्याला स्वप्नात दिसलेली असते तीच व्यक्ती प्रत्यक्ष भेटते. त्यानंतर त्याला भीमा अमरजा संगमावर आणून ती व्यक्ती कथा सांगण्यास सुरुवात करते. ही घटना शके 1490 मध्ये घडलेली आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की, 110 वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. त्यांनी भीमा अमरजा संगमावर एक महिने वास्तव्य करून सिद्ध व नामधरकाच्या संवादातून गुरुचरित्र सांगितले.
भगवान दत्तात्रेयांच्या उपासनेमध्ये गुरुचरित्र या ग्रंथाला वेदाची मान्यता दिली गेलेली आहे. दत्त भक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय प्रिय आहे. ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ दत्तात्रेयांचे आख्यान किंबहुना श्रीनृसिंहसरस्वत्युपाखान आहे. या उपाख्यानात विविध कथा गुंफल्या असून मुख्य आख्यान, उपाख्यान, पूर्वकथा व दु:खितांच्या कथांची एका वर्तुळातून दुसरे वर्तुळ अशी रचना केलेली आहे; त्यामुळे चक्रव्युहाचा भास होत राहतो.
गुरुचरित्र ग्रंथाचे स्वरूप :
गुरुचरित्र संस्कृत भाषेतील ग्रंथ असून त्याचा मूळ मजकूर ओव्या रूपात आहे. यामध्ये 53 अध्याय असून 3 विभागांत हा ग्रंथ विभागलेला आहे:
- भक्ती/ध्यानखंड: यामध्ये दत्तात्रेयांचा स्तोत्र आणि उपासना यांचे वर्णन आहे.
- कर्मखंड: या विभागात दैनंदिन जीवनातील योग्य कर्मे, धर्माचरण, भक्तीमार्ग, आणि सुसंस्कार यांचे मार्गदर्शन केले आहे.
- ज्ञानखंड: या भागात आध्यात्मिक मार्ग, वेद, उपनिषदांतील विचार, आणि मोक्षप्राप्तीसाठी उपदेश आहेत.
विविध कथांच्या माध्यमातून भक्ती म्हणजे ध्यान कर्म आणि ज्ञान या त्रिगुणांचा समन्वय साधला आहे या तीनही प्रकारच्या उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे सुंदर विवेचन या ग्रंथात केलेले आहे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी कशी भक्ती करावी कसे आचरण ठेवावे याचे अतिशय तत्त्वबद्ध आणि मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले गेलेले आहे गुरुचरित्र या ग्रंथाविषयी परमपूज्य श्री टेंबे स्वामी यांनी सांगितलेच आहे ना की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य नाही झाली तरी चालेल परंतु गुरुचरित्रातील कमीत कमी पाच ओव्या नित्य वाचल्या पाहिजेत.
दत्तप्रभूंचे अवतार श्री नृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र ग्रंथ लिहिला गेला त्यामुळे या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान लाभले. श्रीगुरुंनी या ग्रंथाला "भक्तकामकल्पद्रुंम" म्हटलेले आहे. गुरुचरित्र या ग्रंथातील प्रत्येक ओवी मध्ये ईश्वरी शक्ती भरलेली आहे. जो कोणी या ग्रंथाचे शास्त्रशुद्ध आणि नियमाने, भक्तीने, प्रखर विरक्तीने पारायण करील तो प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीत सर्वश्रेष्ठ होईल. त्याला दोन्ही प्रकारचे सुख प्राप्त होतील. गुरुचरित्र हा ग्रंथ आपल्याला आत्मानुभव, आत्मसाक्षात्कार घडवून देतो. आपण केलेली कर्म हीच आपल्याला तारक किंवा मारक ठरत असतात. हे या ग्रंथात आपल्याला शिकायला मिळते. म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहावे हीच चांगले कर्म आपल्याला या भवसागरतून तारुण नेतील.
गुरुचरित्र ग्रंथाचे महत्त्व :
- आध्यात्मिक प्रेरणा: गुरुचरित्र वाचल्याने भक्ताच्या जीवनात शांतता आणि आत्मिक समाधान येते.
- दत्त संप्रदायाची महती: या ग्रंथाच्या माध्यमातून दत्तात्रेयांची उपासना आणि त्यांचे तत्वज्ञान समजून घेता येते.
- रोगमुक्ती व संकटांचे निवारण: गुरुचरित्र वाचनाला संकटातून मुक्तीचा उपाय मानले जाते.
अज्ञान तिमिर रजनीत |
निजलो होतो मदोन्मत्त |
गुरुचरित्र मज अमृत |
प्राशन करविले दातारा ||
गुरुचरित्र वाचनासाठी नियम :
गुरुचरित्र वाचन करताना काही नियम पाळले जातात:
- हे ग्रंथ ओव्या स्वरूपात असून दररोज सातत्याने वाचले जाते.
- वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
- वाचनासाठी ठरविक वेळ ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
- वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये.
- वाचनापूर्वी मनाची आणि शरीराची शुद्धता राखणे आवश्यक आहे.
- वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
- सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे .
- सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
- रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे.
- झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात.
- वाचन पूर्ण झाल्यावर अखेरच्या दिवशी उद्यापन करण्याची परंपरा आहे.
- उद्यापनच्या दिवशी आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
उपासनेतील भूमिका :
गुरुचरित्र वाचन दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, व्रतपूर्ती, किंवा विशेष प्रसंगी मोठ्या भक्तिभावाने केले जाते. गुरुचरित्राचे पारायण करत असताना प्रत्येकाने आपले आत्मसंशोधन केले पाहिजे. आपण नेमके कशासाठी हे पारायण करतो आहोत. यामागील आपला हेतू काय? त्या मागचा आपला हेतू धर्मसापेक्ष आहे की निरपेक्ष? हे आत्मपरीक्षण जर आपण करू शकलो तर श्री गुरुचरित्राच्या वाचनातून आपल्याला प्रगतीचा मार्ग, आपला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आपोआप भेटेल. इतकेच काय तर श्रीगुरुंकडनं आपली काळजी घेतली जाईल. आपणास कधी गुरुचरित्र हा पवीत्र ग्रंथवाचण्याची संधी मिळाल्यास अवश्य लाभ घ्यावा.
सध्या उपलब्ध आहेत त्या मूळ गुरुचरित्र प्रतिमधून गुरुचरित्राची व्यापकता समजण्यात खूप अडचण येते आणि काही धर्ममार्तंडांनी गुरुचरित्राचे अध्याय, त्यातील ओव्या कमी करून लहान केले आहेत. आपल्या सोयीनुसार ते बनवले आहेत त्यामुळे हवे ते फळ प्राप्त होत नाही.
मराठी भाषांतर
गुरुचरित्राचा मूळ ग्रंथ प्राकृत भाषेत असून, याचे मराठीत विविध लेखकांनी भाषांतर केले आहे. या ग्रंथाचे मराठी भाषांतर साध्या आणि सुबोध भाषेत उपलब्ध आहे.
गुरुचरित्र ग्रंथाविषयी माहिती | Information About GURUCHARITRA#
इतर लेख -
- कुलदेवी आणि कुलाचार | Kuldevi Ani Kulachar#
- एका प्रेमाची गोष्ट: श्रीकृष्ण आणि राधा ! Love Of Radha Krishna#
- सुतक म्हणजे काय? | सुतकाचे नियम | SUTAK #
- आध्यात्म आणि व्यवहार: परस्पर संबंध । Adhyatma Ani Vyavhar #
- मतदान | मतदानाचा हक्क | Election Rights#
- धर्मो रक्षति रक्षितः | Dharmo Rakshati Rakshitah #
- राशी चक्र | राशी चक्राचे महत्त्व | १२ राशी | Zodiac Circle#
- व्यभिचार: एक सामाजिक आणि नैतिक आव्हान/ Adultery, Incest, Immorality#
- वडील | बाप | जनक | पिता | बाबा |- Father #
- पती आणि पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी व नाते टिकवण्यासाठी उपाय # Husband Wife Relation #
- पितृदोष म्हणजे काय? । पितृदोषाचे परिणाम व त्यावरील उपाय | Pitrudosh : Parinam Ani Upay#
- श्रीकृष्ण आणि राजकारण/ Politics of Krishna#
- भ्रष्टाचार- एक समस्या / Corruption/ Types of corruption #
- पती पत्नीतील वाद व त्यावरील उपाय / Pati Patni madhil Vaad Ani Upay #
- चहाचा इतिहास | History Of Tea #
आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास, जरूर कळवा! 😊
Post a Comment