गुरु महात्म्य/ गुरु महिमा/ Guru Mahatmya/ Guru Mahima#
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. या पवित्र अशा भारत भूमीत अनेक आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या आहेत. त्यातीलच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा होय. गुरूशिवाय शिष्याला तरणोपाय नाही. "या पृथ्वीवर भगवंत जरी अवतार घेऊन आला तरी त्याला गुरु हा करावाच लागला आहे." जिथे भगवंताने गुरु करावे तेथे आपल्यासारख्या साधारण मानवाचे काय होणार? मनुष्यजीवन हे अज्ञानरूपी अंधकाराने भरलेले आहे मानव जीवनातील याच अज्ञानरूपी अंधकाराचा अंत करून त्या मानवाचा किंवा त्या शिष्याचा निर्गुण निराकार अशा भगवंताशी संबंध घडवण्याचे कार्य गुरु करतात. निर्गुण निराकार अशा भगवंताचे साकार रूप म्हणजेच गुरु होय आणि गुरूंचे निर्माण रूप म्हणजेच भगवंत होय.
उपनिषदांच्या अभ्यासानुसार सुरुवातीच्या काही मौखिक परंपरेत गुरु-शिष्य परंपरा ही हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांमध्ये विकसित झाली उपनिषद हा शब्द संस्कृत भाषेतील आहे या शब्दाचा अर्थ "उप" म्हणजे जवळ, "नी" म्हणजे खाली, "षद" म्हणजे बसण्यासाठी असा होतो म्हणजेच उपनिषदाचा अर्थ- अध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी अध्यात्मिक शिक्षकाच्या जवळ बसणे असा होतो.
गुरुचे स्थान हे नेहमीच सर्वोच्च असते गुरु आणि गुरु भक्ती पेक्षा काही श्रेष्ठ नाही हे शास्त्र देखील मान्य करते आता आपणास एक प्रश्न पडला असेल की जर वेद आहेत पुराण आहेत शास्त्र आहेत हे सर्व वाचून मी स्वतःचा उद्धार करू शकतो मग मी गुरू का गुरु म्हणजे काय आणि आपल्यावर गुरुकृपा झाल्यास ती कशी कार्यकर्ते हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते ।।
गुरु मधील गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश होय याचाच अर्थ अंधकारातून प्रकाशात घेऊन जाणारा मार्गदर्शक व्यक्ती म्हणजेच गुरु होय." शिष्यांना योग्य ते मार्गदर्शन करून अध्यात्मिक प्रगती साधून देणे आणि त्या दिशेने पुढे जाण्यास मार्गदर्शन करणाऱ्यास गुरु असे म्हणावे मनुस्मृती मध्ये गुरु ची व्याख्या खालील प्रमाणे केली आहे.
निषेकादीनि कार्माणि य: करोति यथाविधि।
सम्भावयति चान्नेन स विप्रो गुरुरुच्यते।
जो विप्र निषक आदि संस्कारों को यथा विधि करता है और अन्न से पोषण करता है वह 'गुरु' कहलाता है। इस परिभाषा से पिता प्रथम गुरु है, तत्पश्चात् पुरोहित, शिक्षक आदि। मंत्रदाता को भी गुरु कहते हैं।
गुरु नसलेला साधक म्हणजे कच्च्या मातीचा घडा होय. त्यात पाणी टाकले असतात ते पाझरून बाहेर निघून जाते त्याने कितीही वाचून ज्ञान ग्रहण केले तरी योग्य दिशेने जाईलच याची खात्री नसते. जसे कच्च्या घड्यात ते पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नसते त्याचप्रमाणे बिना गुरूच्या साधकांमध्ये ज्ञान संग्रहित करून ठेवण्याची क्षमता नसते. गुरु ही अशी शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यास सक्षम आहे. जसा एखादा कुंभार कच्चे मडके भट्टीमध्ये तापवून पक्के बनवतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या ज्ञानाने कच्च्या घड्यारुपी शिष्याला पक्के बनवतात. ते स्वतःच्या ज्ञान शक्तीने शिष्याच्या ज्ञानशक्ती ला आपल्या स्तरावर घेऊन येतात म्हणजेच ते आपल्या ज्ञान सामर्थ्याने, साधनारुपी अग्नि ने आपल्या शिष्याची ज्ञान संग्रहण शक्ती वाढवतात मग हळूहळू शिष्य गुरु जवळील ज्ञान संग्रहित करून स्वतः गुरुपदाला जाऊन पोहोचतो.
रुद्र माला या ग्रंथातील पुराव्यानुसार तर असे म्हणता येईल की जो मूर्ख साधक किंवा शिष्य स्वतःचे जप तप अध्यात्मिक ज्ञान गुरूंकडून मिळवण्या ऐवजी पुस्तके वाचून मिळवतो तो केवळ आणि केवळ पापांचा अधिकारी होतो त्याला कोणीही तारू शकत नाही फक्त गुरुच त्याच्या या सार्या पापांना एक निमिषमात्रात नष्ट करू शकतात. शास्त्रांमध्ये गुरु महात्म्य वर फार जोर दिलेला आहे कलियुगाच्या आधीच्या युगांमध्येही गुरु शिष्य परंपराप्रमाणेच ज्ञानदान केले जायचे.
गुरु चे महत्व कालही होते आजही आहे आणि उद्याही राहणार स्वतः शिवशंकरांनी म्हटले आहे "गुरु का द्रोही सो हरिका द्रोही! वाका मुख ना देखे कोई" ज्याने गुरु द्रोह केला त्याने प्रत्यक्ष भगवान श्रीहरीशी द्रोह केल्याचे पाप लागते आणि त्याचे मुख कोणीही पाहू नये असे देवाधिदेव महादेवांचे म्हणणे आहे. ज्या साधकाला गुरु कोण आहेत आणि काय आहेत याचा बोध झाला ज्याने गुरूच्या ज्ञानाचा आणि शक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, तो साधक आपल्या गुरूच्या प्रत्येक शब्दाला मंत्र समजून पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण नेमाने त्याचेे पालन करतो. साधकाची अध्यात्मिक जीवन यात्रा गुरु प्राप्ति नंतरच सुरू होते. शिष्याची सर्वांगिन अध्यात्मिक उन्नती होवो असे ज्या क्षणी श्री गुरु च्या मनात आले त्या क्षणी शिष्याची खरी प्रगती होते त्याला गुरुु कृपा प्राप्त होते.
श्रीगुरूच्या नुसत्या अस्तित्वाने शिष्याचा सर्वांगीण विकास होत असतो उदाहरणार्थ सूर्य उगवतो तेव्हा सर्वजण उठतात, फुले कळ्या ही उमलतात, हे केवळ सूर्याच्या अस्तित्वाने होते. सूर्य कोणाला सांगत नाही की उठा जागे व्हा त्याचप्रमाणे श्री गुरूंचे कार्य असते.
नीचं शय्यासनं चास्य सर्वदा गुरुसंनिधौ । गुरोस्तु चक्षुर्विषये न यथेष्टासनो भवेत् ॥
शरीरं चैव वाचं च बुद्धिन्द्रिय मनांसि च । नियम्य प्राञ्जलिः तिष्ठेत् वीक्षमाणो गुरोर्मुखम् ॥
Post a Comment