जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

सोमवती अमावस्या - एक पवित्र पर्वकाळ | Somvati Amavasya - Ek Pavitra Parvakal#

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

सोमवती अमावस्या - एक पवित्र पर्वकाळ | Somvati Amavasya - Ek Pavitra Parvakal#

सोमवती अमावस्या - एक पवित्र पर्वकाळ

सोमवती अमावस्या हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्व असलेला दिवस मानला जातो.  हिंदू पंचांगानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे संबोधले जाते. या दिवशी धार्मिक व्रत, पूजा, उपवास आणि गंगा स्नान केल्याने विशेष पुण्य लाभ मिळतो, अशी श्रद्धा आहे. 

सोमवती अमावस्येचे महत्त्व

सोमवती अमावस्या ही फक्त धार्मिकच नव्हे, तर सामाजिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. या दिवशी केलेल्या उपवासाने आणि पूजाअर्चनेने मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते. हिंदू धर्मात या दिवशी पिंपळाच्या झाडाभोवती 108 प्रदक्षिणा घालून पूजा केली जाते. पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते, त्यामुळे पिंपळ पूजेला विशेष महत्त्व आहे. पिंपळाची पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्येला सकाळी स्नान करून पितरांना तर्पण, पिंडदान किंवा श्राद्ध करावे. यामुळे पितरांना आनंद होतो आणि पितृदोषही दूर होतो.  या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात तसेच शिव व पार्वतीची पूजा करतात. भगवान शिव, देवांचे देव, महादेव जे कालचाही पराभव करतात. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा आणि मंत्रोच्चार केल्याने त्यांची विशेष कृपा राहते. या व्रतामुळे आयुष्यातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते. यासोबतच घर नेहमी सुख, वैभव, शांती, समृद्धीने भरलेले असते

हे वाचा : 50 प्रेरणादायी विचार | 50 Inspirational Thoughts#

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, एका राज्यात एक गरीब ब्राह्मण राहत होता. पैशाअभावी त्यांच्या मुलीचे लाम्र होत नव्हते. ब्राह्मणाने जेव्हा साधूला त्यांच्या मुलीच्या लग्रासाठी उपाय विचारला तेव्हा साधूने सांगितले की, एक परिट महिला जवळच्या गावात तिचा मुलगा आणि सुनेसोबत राहते. जर एखाद्या ब्राह्मणाच्या मुलीने त्या परिट महिलेची सेवा केली आणि तिने आनंदी होऊन त्या बदल्यात तिला सिंदूर दिले तर मुलीचे लग्र निश्चितच होईल. हे ऐकून ब्राह्मणाच्या मुलीने सकाळी लवकर जात त्या महिलेच्या घरातील सर्व कामे केरू लागली आणि हा प्रकार परिट महिलेच्या सुनेला कळला नाही, त्यानंतर, एके दिवशी त्या परिट महिनेने आपल्या सुनेला विचारले की, जी सकाळी लवकर उठून सर्व कामे कशी करते? यावर सून म्हणाली मला वाटले तुम्हीच हे काम करताय. सुनेचे म्हणणे ऐकून महिलेला धक्काच बसला आणि तेव्हापासून ती घरावर लक्ष ठेवू लागली. सकाळी परिट महिलेला जाग आली तेव्हा तीला एक मुलगी शांतपणे येऊन घरातील काम करताना दिसली. हे अनेक दिवस चालू राहिले. एके दिवशी परिट महिलेने त्या मुलीला पकतले आणि तिला असे करण्याचे कारण विचारले.

यानंतर मुलीने साधूने सांगितलेली सर्व गोष्ट त्या परिट महिलेला सांगितली. ब्राह्मण मुलीचे म्हणणे ऐकूण त्या परिट महिलेने स्वतःसाठी मागवलेला सिंदूर देण्याचे मान्य केले, पण त्याचवेळी तिव्या पतीचा मृत्यू झाला. परिट महिलेच्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून, ब्राह्मण मुलगी दुःखी होऊन घरातून निघून गेली आणि एका पिंपळाच्या वृधाजवळ पोहोचल्यानंतर तिने 108 विटांचे तुकडे घेतले, 108 वेळा प्रदक्षिणा घातल्या आणि एक एक करून फेकण्यास सुरुवात केली. मुलीने असे केल्याने त्या परिट महिलेच्या नवऱ्याला जीवदान मिळाले, तर ब्राह्मण मुलीला सोमवती अमावस्येला पिंपळाची प्रदक्षिणा केल्याने शुभ फळ मिळाले.

या दिवशी केले जाणारे धार्मिक कार्य

  • कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. यामुळे पितरांनाही शांती मिळते.
  • सूर्य आणि तुळशीला जल अर्पण करा आणि गायत्री मंत्राचा जप करा. तुळशीची १०८ वेळा प्रदक्षिणा करा.
  • सूर्यदेवतेकडे पाहताना हात जोडून त्याची स्तुती करा. "ॐ सूर्याय नम:" मंत्राचा जप करा. आपल्या पितरांच्या शांतीसाठी भगवान सूर्यदेवाला प्रार्थना करा.
  • पिंपळाच्या झाडाभोवती १०८ वेळा धागा गुंडाळून प्रदक्षिणा घालावी आणि प्रार्थना करावी. त्यावर दूध, दही, हळद, कुंकू, चंदन, अक्षत, फुले, हार, काळे तीळ अर्पण करावे.
  • या दिवशी गरीबांना अन्न, कपडे, आणि पैशांचे दान करणे शुभ मानले जाते.
  • भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी.
  • उपवास करून दिवसभर भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी.

सोमवती अमावस्येला काय करू नये

  • सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मद्य, मांस इत्यादींचे सेवन करू नये.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा, आई-वडिलांचा, मोठ्या भावाचा किंवा आजी-आजोबांचा अपमान करू नये.
  • सोमवती अमावस्येच्या दिवशी पती-पत्नीने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवणे टाळावे.

शास्त्रीय दृष्टिकोन

सोमवती अमावस्या ही सूर्य आणि चंद्राच्या राशींच्या संयोगामुळे निर्माण होते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी केलेली साधना आणि तप हे फलदायी असते. या दिवशी प्रखर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

आधुनिक काळातील महत्त्व

आजच्या धकाधकीच्या जीवनात मनःशांतीसाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी अशा व्रतांचे पालन महत्त्वाचे आहे. सोमवती अमावस्या आपल्याला श्रद्धा, भक्ती, आणि निसर्गाशी जोडण्याचा मार्ग दाखवते. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने आपण आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि मन:शांती मिळवण्यासाठी या दिवशी साधना, पूजा आणि दानधर्म अवश्य करावा.

तुम्ही हे ब्लॉग वाचलेत याबद्दल धन्यवाद! आशा आहे की तुमच्यासाठी या लेखातून काहीतरी नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली असेल. तुम्हाला काही विचारायचं असेल तर कृपया कंमेंट्समध्ये तुमचे मत व्यक्त करा. तुमच्या अभिप्रायांचा आम्हाला नेहमीच आधार आहे. पुढील लेखांसाठी आमच्या ब्लॉगला भेट देत राहा. धन्यवाद आणि शुभेच्छा!

तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभवांबद्दल ऐकायला आम्हाला आनंद होईल. 
पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया.

ॐ आदेश अलख निरंजन


Follow my Instagramchannel

नवीनतम अपडेटसाठी सबस्क्राइब करा: https://omaadesh.blogspot.com

इतर लेख -

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.