जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे.

भाग्यवान स्त्री ची लक्षणे | Characteristics of a lucky woman#

!!ॐ चैतन्य नवनारायनाय नमः!!

भाग्यवान स्त्री ची लक्षणे | Characteristics of a lucky woman#


भाग्यवान स्त्री ची लक्षणे | Characteristics of a lucky woman#

साधारणतः पुरुषांची इच्छा असते की त्यांचे लग्न भाग्यशाली आणि कुळाचा उद्धार करणारी अशा स्त्रीशी व्हावे,. परंतु सामान्य पद्धतीने स्त्रीकडे पाहून आपण तिचे आकलन करू शकत नाही. कारण सुंदर दिसणारी स्त्री कटकारस्थान करणारी असू शकते. याउलट साधी-सरळ दिसणारी स्त्री कर्तुत्ववान असू शकते. ज्योतिष शास्त्रामध्ये एक अशी विद्या आहे, ज्यावरून कोणत्याही स्त्री कडे पाहून तिच्या विषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे.

या विद्येला सामुद्रिक विद्या म्हणतात. हिंदू धर्म ग्रंथानुसार सामुद्रिक शास्त्राची रचना शिव पार्वती पुत्र कार्तिकेयने केली आहे. या ग्रंथानुसार आज आम्ही तुम्हाला स्त्रियांच्या अशा काही खास लक्षणांबद्दल सांगत आहोत, ज्यावरून कोणत्या स्त्रिया भाग्यशाली असू शकतात हे समजू शकेल...

श्लोक
पूर्णचंद्रमुखी या च बालसूर्य-समप्रभा।
विशालनेत्रा विम्बोष्ठी सा कन्या लभते सुखम् ।1।
या च कांचनवर्णाभ रक्तपुष्परोरुहा।
सहस्त्राणां तु नारीणां भवेत् सापि पतिव्रता ।2। 

अर्थ - ज्या मुलीचे मुख चंद्रासमान गोल, शरीराचा रंग गोरा, डोळे थोडे मोठे आणि ओठ हलकेसे लालसर असतात, अशी मुलगी जीवनात सर्व सुख उपभोगते.ज्या स्त्रीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा असेल आणि हातांचा रंग कमळासमान गुलाबी असेल तर ती स्त्री हजारो पतिव्रता स्त्रियांमध्ये मुख्य असते.

हे वाचा : सोमवती अमावस्या - एक पवित्र पर्वकाळ | Somvati Amavasya - Ek Pavitra Parvakal#

भाग्यवान स्त्रियांची अजून काही लक्षणे :

  • नाकाच्या पुढील भागावर तीळ असणार्‍या मुली खूप भाग्यवान असतात. नाकावरील तीळ धन, संपन्न जीवनाचे संकेत असतं.
  • रुंद कपाळ आणि मोठे डोळे असलेले स्त्री भाग्यवान मानली जाते.
  • भाग्यवान स्त्री ची बोटे लांब असतात.
  • ज्या स्त्रीच्या पायाची बोटे सारखी असतात ती स्त्री भाग्यवान असते.
  • आनंदी चेहरा आणि दाट व लांब केस असणारी स्त्री भाग्यवान असते.
  • ज्या स्त्रीच्या तळपायावर कमळ, शंखचक्र अथवा गजरेषा असते ती स्त्री भाग्यवान समजली जाते.

  • जी स्त्री आपल्या पतीचा आदर करते व घरातील वडीलधाऱ्यांच्या आदेशाचे पालन करते अशी स्त्री भाग्यवान समजली जाते.
  • ज्या स्त्रीच्या पायाच्या टाचा गोल आकाराच्या व मऊ असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात कारण त्या संपूर्ण आयुष्य सुख-सुविधा उपभोगतात.
  • ज्या स्त्रियांची बेंबी मोठी आणि खोल असते त्या शुभ मानल्या गेल्या आहेत. अशा स्त्रिया धन, सुख आणि संतान सुखाने संपन्न असतात.

  • ज्या स्त्रीच्या जिभेचा रंग लाल असतो आणि ज्या स्त्रियांची जीभ नाजुक असते त्यांना जीवनात सुख प्राप्ती होते. यांच्या भाग्यामुळे कुटुंबातील भाग्य देखील उजळतं.

  • गोल आकाराचा उभार घेतलेला अंगठा असणारी स्त्री नेहमी पतीसाठी समर्पित असते. कुटुंबासाठी अशा स्त्रिया भाग्यशाली असतात.
  • जी स्त्री सावळ्या रंगाची असते, जिचे मुख, दात आणि मस्तक स्निग्ध सरळ असते अशी स्त्री भाग्यवान असते.
  • ज्या स्त्रीच्या डोळ्याखालची बाजू लालसर, बुबुळ काळे असते आणि आतली बाजू पांढरी असते तसेच भुवया काळ्या असतात अशा महिला भाग्यवान व पावित्र्य पाळणाऱ्या असतात.

ही लक्षणे आध्यात्मिक आणि मानसिक दृष्टीकोनातून भाग्यवान स्त्रीची असू शकतात. यामध्ये प्रेम, दयाळूपण, आणि उच्चतम आध्यात्मिक उद्दीष्ट साधण्याचा समावेश आहे.

भाग्यवान स्त्री ची लक्षणे | Characteristics of a lucky woman#
भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे |Bhagyavan striyanchi लक्षणे | भाग्यशाली स्त्रिया

तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभवांबद्दल ऐकायला आम्हाला आनंद होईल. 
पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया.

ॐ आदेश अलख निरंजन


Follow my Instagramchannel

नवीनतम अपडेटसाठी सबस्क्राइब करा: https://omaadesh.blogspot.com

इतर लेख -

No comments

चला इथे एक छानसा अभिप्राय द्या

Powered by Blogger.